सूमीरमा फाउंडेशन द्वारा 14 फेब्रुवारी 2024 रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम करण्यात आला
14 फेब्रुवारी हा दिवस सर्वीकडे व्हॅलेंटाईन डे च्या रुपात साजरा केला जातो परंतू हा दिवस आपल्या देशासाठी काळा दिवस ठरला. यामध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले या जवानांना हुतात्मा स्मारक, नेहरू पार्क अकोला येथे सुमीरमा फाउंडेशन द्वारा पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला कार्यरत पोलिस वर्ग व पार्क मधील अनेक लोकांनी सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ पुजा रमाकांत खेतान सोबत भावना अग्रवाल, किर्ती काळे, गुंजन हिंगे, आशिष खिल्लारे, सोनू ठाकूर, विशाल धांडे, रितेश गोयल, संजय ठोके, प्रवीण काळे, सुमित शेकु, आकाश सोनोने, लवकेष शर्मा, पार्थ गोरे, गौरव मौर्य आदींनी परिश्रम घेतले.
सविस्तर वृत्त येथे 👇 पहा....
0 टिप्पण्या