सिंधू सहकार पॅनल चे सर्व उम्मीदवार विजयी
अकोला : सहकार क्षेत्रात अग्रणी भारतीय सिंधू सहकारी पत संस्था मर्या. अकोला च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या वर्ष 2024-29 च्या निवडणूकीत सिंधू सहकार पॅनल चे सर्व उम्मीदवार प्रचंड बहुमतानी विजयी झाले, राखीव मतदार संघातील पॅनल चे 5 ही उम्मीदवार अविरोध विजयी झाले, ज्या मध्ये श्री लीलाराम पंजवानी, श्री सुनिल पवार, श्री संतोष पाचपोर, सौ. चंद्रा हरीश मनवानी व सौ. सत्या हिरालाल कृपलानी तसेच सर्व साधारण मतदार संघात सिंधू सहकार पॅनल चे सर्व 6 उम्मीदवार प्रचंड बहुमतानी विजयी झाले, सिंधू सहकार पॅनल चे सर्व सुत्र संभाळणारे तसेच संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि सतत 32 वर्षा पासून संचालक असलेले श्री विनोद मनवानी सर्वाधिक मतानी विजयी झाले तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक दर्यानी, श्री अशोक अरोरा, श्री तोलाराम मेंघानी, श्री मनीष लुल्ला व श्री रवि पंजाबी हे सर्व उम्मीदवार आपले प्रतिस्पर्धी उम्मीदवार च्या तुलनेत प्रचंड मत घेवूण विजयी झाले.
संस्थेच्या वर्तमान पॅनल चे सर्व उम्मीदवारांवर पूर्ण विश्वास कायम ठेवूण प्रतिस्पर्धी उम्मेदवारांना पूर्ण पणे नाकारून दिलेले आहेत. सदर निवडणूकीत सहकार पॅनलच्या सर्व उम्मेदवारांना 3100 पेक्षा जास्त मते मिळालेले असुन मात्र प्रतिस्पर्धी उम्मीदवारांना फक्त 300 आणि 386 मतावर समाधान मानावे लागले. सिंधू सहकार पॅनल ने संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले व भविष्यात अश्या प्रकारे सहयोग व विश्वास कायम राहील आणि संस्था प्रगति पथावर अजून तीव्र गतिने वाटचाल करील, अशी अपेक्षाकृत विनंती संचालक मंडळानी केली आहे. संस्थेचे हित रक्षण आणि सभासदांचा कायम ठेवण्या करिता नव निर्वाचित संचालक मंडळ कटिबध्द आहे, असे मनोगत सहकार पॅनल नी केलेले आहे.
0 टिप्पण्या