Ticker

6/recent/ticker-posts

शासनाने समाजसेवकांचे न्याय्यहक्क अबाधीत ठेवले पाहिजे.याकरीता गुरुवारी तहसिल कार्यालयावर नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन 

शासनाने समाजसेवकांचे न्याय्यहक्क अबाधीत ठेवले पाहिजे.याकरीता गुरुवारी तहसिल कार्यालयावर नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन 


 कारंजा (लाड) : सध्याचे शासन एकीकडे,धनदांडग्यांचे व प्रस्थापितांचे लालन पालन करीत त्यांना पाठीशी घालत आहे. तर दुसरीकडे तळागाळातील, गोरगरीब सच्च्या देशभक्त समाजसेवक व लोककलावंतावर हेतुपुरस्परणे अन्याय करीत आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे "गेल्या पन्नास वर्षापासून,आपल्या सप्तखंजेरीच्या प्रबोधनातून समाजातील अंधश्रद्धा,जातीभेद, व्यसनमुक्ती,घनकचरा नियोजन, बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडाबळी,स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन, निरक्षरता निर्मूलन,शिक्षणाचे महत्व, हागणदारी मुक्त गावखेडी, सेन्द्रीय शेती वापर इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करणाऱ्या, राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगे बाबाच्या दशसुत्री संदेशाने प्रेरीत होऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने केवळ समाजाकरीता तनमनधनाने आयुष्य वेचणाऱ्या, तळागाळातील गावखेड्याच्या,बहुजन समाजातील -गुरुवर्य श्री. सत्यपाल महाराज चिंचोलिकर रा.अकोट जि.वाशिम यांना महाराष्ट्र शासनाने,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवांकित करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सकल वैदर्भिय जनता व श्री सत्यपाल महाराजांच्या शिष्यमंडळींकडून होत असतांनाही,महाराष्ट्र शासन तळागाळातील,गोरगरीब,दारिद्री जनता व मुख्यत्वे करून बहुजन समाजावर हेतूपुरस्परपणे अन्याय करीत, वैदर्भिय गोरगरीब जनतेच्या भावना दुखवून, वेळोवेळी सच्च्या लोककलावंत व समाजसेवकांची दया माया न करता त्यांना त्यांच्या न्याय्यहक्कांपासून दूर लोटीत, मोठमोठ्या धनाढ्य,दिग्गज अशा चित्रपट क्षेत्रातील लोकांची, निःस्वार्थ समाजसेवकांच्या या पुरस्काराकरीता निवड करीत आहे. त्यामुळे तळागाळातील गोरगरीब लोककलावंत आणि बहुजन समाजातील समाजसेवकांमध्ये या शासनाविषयी असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ पहात आहे.


त्यामुळे "शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार धनदांडग्याना वितरीत करण्याचा निर्णया विरुद्ध आणि महत्वाचे म्हणजे शासनाच्या पुरस्कारा बाबत वेळोवेळी अक्षरशः जातियवाद करीत बहुजन समाजाला उपेक्षित ठेवण्या विरुद्ध विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचेकडून उद्या, दि. 01 फेब्रुवारी 2024 रोजी कारंजा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात दुपारी 01:00 वाजता अचूक वेळेवर,सर्व लोककलावंत, समाजसेवक ,नागरीक व सर्वपक्षियांनी एकत्र येऊन शासनाचा निषेध व्यक्त करीत श्री सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असून,शासन बहुजन समाजाची दखलच घेणार नसेल तर आगामी सार्वत्रिक निवडणूकामध्ये कोणत्याही किर्तनकार, प्रवचनकार आणि लोककलावंतांनी राजकिय निवडणूकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेऊन शासनाला निवेदन देऊन स्पष्टपणे कळविण्यात येणार आहे. तरी सर्व लोककलावंत,समाजसेवक, सर्वपक्षिय कार्यकर्ते व नागरिकांनी गुरुवार दि 01 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 01:30 वाजता एकत्र येण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजाचे विजय खंडार, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने, विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे यांनी केले आहे.


महासंस्कूती महोत्सवात समता संदेश सांस्कृतिक कलापथकाला रसीकाचा प्रतीसाद


वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :
सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक २७ ते ३१ जानेवारी महासंस्कूती महोत्सवाचे जिल्हा क्रीडा संकुल मैदान सिव्हील लाईन वाशिम येथे आयोजन केले आहे त्यामध्ये दिनांक ३० जानेवारीला सायंकाळी ७ :०० वाजता‌ राष्ट्रपिता महात्मा गांधी ‌राज्यस्तरीय‌ व्यसणमुक्ती पुरस्कार प्राप्त शाहीर संतोष खडसे समता संदेश सांस्कृतिक कलापथक‌‌ उमरा शम‌. ता‌. जि. वाशिम यांनी पारंपरिक लोककला गण,गवळण, बतावणी लावणी खडीगमंत सादर करुण रसीकाच्या टाळ्याच्या कड़कड़ाट सह प्रतीसाद मीळविला त्यांच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी मॅडम, मुख्य जिल्हा व सञ न्यायाधीश राजीवजी पांडे कुंटुंबासह निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे‌, उपजिलाधिकारी कैलास देवरे,जिल्हा माहीती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत जिल्हा परीषद वाशिम जनसंपर्क अधिकारी राम श्रुंगारे यांनी कौतुक केले या कलापथका मधिल कलावंत शाहीर संतोष खडसे,अमोल वानखेड़ नर्तक गौतम जोंधळे ढोलकी वादक , संतोष कांबळे हार्मौनीयम वादक प्रकाश वानखेड़े गुलब्या‌, नामदेव खडसे तुनतुने वादक,आसीत खडसे, गणेश राठोड झांज वादक प्रकाश खडसे,सिद्धार्थ भगत झांजरी वादक,भगवान कांबळे, भगवान भगत,यशवंता खडसे कोरस सहभागी होते असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .


गायवळ येथील शेतकरी रवींद्र गायकवाड यांचा लखपती किसान प्रयोग


कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम गायवळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांनी आपल्या 3.34 हे.आर.शेत जमिनीवरती नैसर्गिक शेतीचा अफलातून अविष्कार साकारलेला आहे यामध्ये त्यांनी एक हेक्टर क्षेत्रफळावरती चिया सीड व किंनवा सीडची लागवड केलेली असून यामधून त्यांना अंदाजे दीड लाखाचे निवड नफा होण्याची शक्यता आहे तसेच एक हेक्टर क्षेत्रफळावरती मोहरी पिकाची लागवड केली असून अल्पशा पाण्यामध्ये एकरी उत्पादन सात क्विंटल येण्याची शक्यता आहे यामधून अंदाजे एक लाख चाळीस हजाराचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचा करार कंपनीसोबत त्यांनी केलेला आहे व चीया सीड किंनवा सीड व मोहरी पिक या पिकांना पाणी कमी लागते तसेच शून्य मशागत पिकामध्ये तंत्रज्ञान वापरून सदर पिकांना अंतर मशागत करण्याची आवश्यकता पडत नाही तसेच सदर पिकांना जंगली जनावराचा सुद्धा त्रास होत नाही यामुळे हे पिके शेतकऱ्यांना लखपती बनवणारी पिके असून शेतकऱ्यांनी चीया सिड ,किंनवा सीड व मोहरी या पिकाकडे वळण्याचे आवाहन रवींद्र गायकवाड यांनी केलेले आहे. शेत बांधावरतीच नैसर्गिक निविष्ठा तयार केल्या असून फवारणी व खताचा खर्च त्यांनी वजा केलेला आहे. स्वतःच्या शेतावरतीच गांडूळ खताची निर्मिती नैसर्गिक निविष्ठाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून स्वतःच्या शेतामध्ये शंभर टक्के वापर त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचा निविष्ठेवरचा खर्च हा शून्य झालेला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री वरती जास्त भर देत असून स्वतःच्या शेतामध्ये उत्पादित झालेल्या महालाकरिता त्यांनी व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक, च्या माध्यमा द्वारे खूप मोठे मार्केट तयार केलेले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा सर यांच्या प्रशिक्षणातून प्रेरित होऊन रवींद्र गायकवाड यांनी आपली सेंद्रिय शेतीची सुरुवात केली होती आज त्यांनी आपल्या गुरुच्या मार्गदर्शनामध्ये सेंद्रिय शेतीचे अफलातून मॉडेल तयार केलेले आहे व ते शेतकऱ्यांकरिता विस्तार शिक्षणाचे खूप मोठे काम करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लखपती किसान प्रयोग पाहण्याकरता रवींद्र गायकवाड यांच्या शेतीला भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केलेले आहे. गायकवाड यांना वेळोवेळी कृषी विभाग कारंजा येथे कार्यरत असलेले मंडळ कृषी अधिकारी गुणवंत ढोकणे व कृषी विज्ञान केंद्र करडा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे.

समाजसेवीका सौ ज्योतीताई गणेशपुरे यांना "महाराष्ट्र रायजिंग स्टार अवार्ड 2024" प्रदान


 कारंजा (लाड) : नुकत्याच मुंबई येथे ग्रामीण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व दिव्य अशा कार्यक्रमात,वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध समाजसेविका, सौ ज्योतीताई अनिल गणेशपुरे यांना त्यांच्या उत्कृष्ट अशा सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याबाबत अधिक वृत्त असे की,सौ ज्योतीताई अनिल गणेशपुरे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहेत.अगदी समाजाकरता "जीवाचे रान करणाऱ्या रणरागिनी, गोरगरिबांच्या कैवारी गोरगरिबांच्या हाकेला ओ देणाऱ्या समाजसेवीका" म्हणूनही जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे ,राजकारण असो की समाजकारण असो,नेहमी धावून येणाऱ्या ज्योतीताई जिल्ह्यातील महिलांचे असामान्य नेतृत्व आहेत.विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यांनी केलेल्या सेवावरती कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सह्याद्री देवराई वृक्ष संवर्धन संस्थेचे संस्थापक, ख्यातनाम मराठी,हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट स्टार,सयाजी शिंदे यांच्या हस्ते 'बेस्ट वर्क इन हेल्थ केअर अँड वेलनेस' या क्षेत्रातील 'महाराष्ट्र रायजिंग स्टार अवॉर्ड 2024' देऊन सौ ज्योतिताई गणेशपुरे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नवी मुंबई, नेरूळ येथील फाईव्ह स्टार हॉटेल कोर्टयार्ड मेरिएट येथे २८ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी रेडिओ जॉकी रिया सेनगुप्ता, गायिका तथा अभिनेत्री दिपाली देसाई, टीव्ही 9 च्या संपादिका निखिला म्हात्रे,दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, दूरदर्शन केंद्र वरळी मुंबईचे माजी संचालक मुकेश शर्मा,दैनिक नवराष्ट्रचे संपादक नरेंद्र कोठारे, न्यूज 18 लोकमतचे न्यूज रीडर तथा मोटिवेशनल स्पीकर विलास बढे,ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, एबीपी माझा चे रिपोर्टर वैभव परब यांच्यासह राज्यभरातील पत्रकार, व्यावसायिक, उद्योजक, आरोग्य व सेवा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ ज्योतीताई गणेशपुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याची माहिती ग्रामीण पत्रकार संघाचे मुंबई विभागीय कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
सौ ज्योतीताई गणेशपुरे यांनी समाजसेवेचा वारसा त्यांच्या सासूबाई कडून घेतला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या