Ticker

6/recent/ticker-posts

क्रिकेटपटू व खेळाडू त्यांच्या गुणांना योग्य ती मिळाली संधी -आ.सावरकर 

क्रिकेटपटू व खेळाडू त्यांच्या गुणांना योग्य ती मिळाली संधी -आ.सावरकर 



अकोला ग्रामीण भागात सुद्धा अनेक क्रिकेटपटू व खेळाडू असून त्यांच्या गुणांना योग्य ती जागा व त्यांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असून यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा ने नमो चषक च्या माध्यमातून 27वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील भेदभाव दूर करून प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने योग्य तो निर्णय घेतला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येत शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व जात पात धर्म विसरून खेळाडू प्रवृत्तीने सहभागी झाले हेच नमो चषकचे यश असल्याचे यामुळे मानवता,भाई चारा व प्रेम, स्नेह विश्वास निर्माण करण्यात यश मिळेल असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले विधानसभा मतदारसंघातील नमो चषक अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील हे होते तर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल अनुप धोत्रे देवेंद्र देवर राजेश बेले अंबादास उमाळे संजू पाटील गावंडे पवन महाले संतोष शिवरकर कृष्णा शर्मा जय पाटील ठोकळ वैभव माहोरे पंकज वाडीवाले शंकरराव वाकोडे दिलीप मामा गव्हाणे तेजराव थोरात माधव मानकर विजय मालोकार विठ्ठल चतरकर चंद्रशेखर पांडे गुरुजी अनमोल गावंडे प्रशांत पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी 71 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार bmc बोरगाव मंजू टीमला तर द्वितीय क्रमांक एफडी रायटर बार्शीटाकळी तर पुरस्कार जय मलकापूर टीमला प्रधान करण्यात आले यावेळी 72 क्रिकेट टीम यांनी भाग घेतला. अनुप धोत्रे यांनी क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व नमो चषक संदर्भात भूमिका मांडली 11 जानेवारी ते 29 जानेवारी बोरगाव मंजू येथील रेणुका नगर मैदानात स्पर्धा चालल्या ५१ हजार होतीस हजार रुपयांचे बक्षिसे व व्यक्तिगत बक्षिसे देण्यात आल्या. आमदार सावरकर सातत्याने क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या सोबत राहून त्यांचा उत्साह वाढत होते. ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात किडापटू पंचवीस वर्षाच्या आतील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले ‌. नमो चषक आयोजन समिती च्या कार्यकर्त्यांनी सतत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला या स्पर्धेमध्ये भाग घेणारे किडापटू प्रमाणपत्र व सीड प्रदान करण्यात आली.


देशी खेळांना वाव शारीरिक क्षमता सोबत मानसिक विकास



अकोला देशी खेळांना वाव देण्यासाठी व प्रत्येकाच्या कर्तुत्वाचा त्यांच्या गुणाचा वापर समाज हित राष्ट्रहित सोबत परिवारा च्या कल्याणासाठी व्हावा व शारीरिक क्षमता सोबत मानसिक विकास व्हावा याकरिता व्यापक दृष्टिकोन ठेवून राज्यभरात भारतीय जनता युवा नमो चषकच्या माध्यमातून युवाशक्तीला संघटित व एकत्रित करून देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या नाळ जोडण्याकरिता विविध स्पर्धा आयोजित केली आहे आणि अकोला पश्चिम पूर्व विधानसभा मतदारसंघातील युवाशक्ती मोठ्या संख्येने प्रत्येक खेळामध्ये भाग घेत आहे हे स्पर्धेचे यश असल्याची प्रतिपादन अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी केले स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे खो खो वॉलीबॉल रेसिंग स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा भाजपा प्रमुख अनुप धोत्रेहेहोते. तर प्रमुख अतिथी म्हणून, पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमुख विजयजी अग्रवाल,जिल्हाअध्यक्ष किशोर मांगटे पाटील,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, कृष्णाजी शर्मा , युवा मोर्चा महानगर अध्यक्ष पवन महल्ले, राजेंद्र गिरी, प्रकाश घोगलीया , चंदाताई शर्मा,व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अकोला पूर्व आणि पश्चिम मधील टीमचे स्वागत अनुप धोत्रे यांनी केले व यावेळी किशोर पाटील यांनी टीमला शुभेच्छा दिल्या विजय अग्रवाल यांच्या नियोजनाखाली अकोला पश्चिम तर आमदार रणधीर सावरकर यांच्या नियोजनाखाली अकोला पूर्व च्या स्पर्धा सुरू असून पन्नास हजार पेक्षा जास्त युवाशक्ती स्पर्धेच्या माध्यमातून जोडण्याचं काम होत असून यावेळी महात्मा गांधी यांना आदरांजली अनुप धोत्रे यांनी देऊन महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा प्रचार प्रसार व त्यांच्या विचारसरणीने त्याला प्रगतीपथावर नेत असल्याचीही त्यांनी सांगितले. संचालन पवन महाले तर प्रास्ताविक सुमनताई गावंडे तर आभार प्रदर्शन गणेश पावसाळे यांनी केले यावेळी चंदा ठाकूर, जानवी डोंगरे सागर शेगोकार राहुल देशमुख संजय झाडोकार, निकिता देशमुख मिलिंद राऊत प्रशांत अवचार विजय इंगळे अजय शर्मा मुस्कान पंजवानी हरिभाऊ काले मोहन पारधी अक्षय जोशी यश सीकरीया प्रकाश धोगलीया आशिष पवित्रकार बाल टाले हरीश अलीम चदाणी, संजय बडवणे मंगला सोनवणे धनंजय धबाले हरीश काळे गीतांजली शेगोकार सिद्धार्थ शर्मा संजय गोटफोडे आम्रपाली उपरवट, एडवोकेट देवाशिष काकड रमेश अल्करी संदीप गावंडे गणेश अंधारे संतोष पांडे निलेश निनोरे रमेश करिहार, एडवोकेट कुणाल शिंदे, आधी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या