Ticker

6/recent/ticker-posts

"घर चलो गाव चलो" अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न- चेनसुख संचेती

 "घर चलो गाव चलो" अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न- चेनसुख संचेती


अकोला- "घर चलो गाव चलो" अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी व 51 टक्के पेक्षा जास्त मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपले लोकप्रतिनिधी यांच्या विकास कामाचा प्रचार प्रसार करून समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून जात-पात धर्म पेक्षा सर्वांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली आहे त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांशी व भाजपाला मतदान करणारे व भाजपा विषयी प्रेम असणाऱ्या सोबत विरोधकांशी सुद्धा भेट घेऊन मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चेनसुख संचेती यांनी केले. भाजपा कार्यालयात अकोला ग्रामीण जिल्हा पदाधिका त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते 


बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते तर मंचावर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल अनुप धोत्रे,विजय अग्रवाल बळीराम सिरस्कार जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने , वैशाली निकम राधादेवी तिवारी माधव मानकर आधी मंचावर विराजमान होते. यावेळी रतलाम अकोला खंडवा रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी 888 कोटी रुपये ची तरतूद करण्यात आली आहे तसेच अकोला रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन तसेच बचत अंतिम बजेट नारीशक्ती वंदन केंद्रीय अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला तसेच ज्ञान वापी व्यास तलधर सुरू केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या योजनेची माहिती व जबाबदारी याविषयी माजी आमदार संचेती यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी घर घर चलो गाव चलो या का अभियानाची पार्टीचे माहिती देऊन प्रवासी कार्यकर्त्यांची जबाबदारी कोणाशी भेट घ्यावी व योजने संदर्भातला पूर्ण डाटा कार्यकर्तासमोर प्रस्तुत केला ऑनलाईन ऑफलाईन जनसंपर्क करण्याचा पार्टीचा कार्यक्रम आपण यशस्वी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयश्री प्राप्त करण्याचा संकल्प करूया. अशी आवाहन केले यावेळी अनुप धोत्रे किशोर पाटील तसेच आमदार प्रकाश भारसाकले, यांनी जोश पूर्ण व अभ्यासपूर्ण माहिती दिली बैठकीचे संचालन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या