Ticker

6/recent/ticker-posts

श्री गुरुदेव सेवा मंडळ पुरुष महिला भजनी मंडळाची वार्षिक बैठक आयोजीत  

श्री गुरुदेव सेवा मंडळ पुरुष महिला भजनी मंडळाची वार्षिक बैठक आयोजीत  
     

    
कारंजा : श्री क्षेत्र गुरुकुंज सेवाश्रम, गुरुकुंज, गुरुदेवनगर मोझरी द्वारा स्थानिक महिला पुरुष भजनी मंडळे नोंदणीकृत करणे,वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेची माहिती देऊन कलाकाराचे प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा,राष्ट्रसंताच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजनाबाबत विचार विनिमय, सालाबादप्रमाणे भजन संमेलनाबाबत चर्चा आणि कारंजा शहर भजनप्रमुखांच्या कार्यकारीणी गठनाकरीता, वार्षिक बैठकीचे आयोजन, शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी, श्री गुरुदेव सेवाश्रम, ग्रामनाथ भवन, शांतीनगर, कारंजा (लाड) जि. वाशिम येथे करण्यात आले असून,श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम गुरुदेव नगर येथील वाशिम जिल्ह्याचे सेवाधिकारी सुनिलभाऊ दशमुखे यांचे अध्यक्षतेखाली, सभेचे प्रमुख अतिथी महिला विभाग जिल्हा सेवाधिकारी सौ ज्योतीताई उगले,सौ छायाताई गावंडे, जिल्हा सेवाधिकारी बाळू पाटील दुर्गे,तालुका सेवाधिकारी गणेश पाटील गांजरे, पंजाबराव बाक्कल, संजय ताथोड, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त लोककलावंत रामबकस डेंडूळे,महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडाळे आदींचे उपस्थितीत,सामुदायिक प्रार्थनेनंतर बैठक आयोजीत करण्यात आलेली असून, भजनीमंडळे व सेवाधारी या सर्वांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधारी संतोष केळकर, तुकाराम गजभार, विजय खंडार आदींनी केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या