जिजाऊ सभागृहाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या वंचित चे अभिनव आंदोलन.....
साफसफाई आणि स्वाक्षरी अभियान राबवणार.....
अकोला
शहरात एकमेव असलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरांमध्ये साफसफाई अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात एक बैठक आज यशवंत भवन येथे पार पडली या बैठकीला. यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, मासाहेब राजमाता जिजाऊ सभागृह ही अकोल्याच्या वैभवात भर घालणारे वास्तू आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या सभागृहाची हालत अतिशय दयनीय झालेली आहे. या सभागृहाची साफसफाई व्हावी आणि या सभागृहाची पवित्रता कायम राखण्यासाठी शासनाने योग्य पावली उचलावी यासाठी वंचित च्या वतीने उद्या चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबत नियोजन बैठक यशवंत भवण येथे आज संपन्न झाली. बैठकीचे सूत्रसंचालन गजाननजी गवई यांनी केले... या बैठकीत वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर, प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, राजकुमार दामोदर, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, पुर्व युवा अध्यक्ष जय तायडे, शोभाताई शेळके, किरणताई बोराखडे, ऍड नरेंद्र बेलसरे,विकास सदांशिव, प्रास्ताविक निलेश देव तर आभार प्रदर्शन सचिन शिराळे यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या