Ticker

6/recent/ticker-posts

नाथसमाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलेला क्षण, अभुतपुर्व सत्कार सोहळा

नाथसमाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलेला क्षण, अभुतपुर्व सत्कार सोहळा


अमरावती/वाशिम -वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने रविवार दिनांक 07/01/24 रोजी अमरावती येथे नाथ समाजाचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवश्यक असलेला प्रश्न म्हणजे नाथ समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आणि त्या महामंडळाच्या प्रश्नाला मंत्रालयीन स्तरावर मार्गी लावण्याचे काम माननीय श्रीकांतदादा देशपांडे (माजी राज्यमंत्री) यांनी केल्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने आज अमरावती येथील त्यांच्या कार्यालयामध्ये भव्य असा सत्कार सत्कार करण्यात आला.


अमरावती कारागृहात नुकत्याच जेलर म्हणून लाभलेल्या विशेष म्हणजे नाथपंथी समाजाच्या मीराताई बाबर यांची सदिच्छा भेट घेऊन,नाथ समाजाचे भूषण म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.अमरावतीचे माजी पालकमंत्री विद्यमानविपस आमदार श्री प्रविण पोटे पाटील यांची त्यांच्या कार्यालयात आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता अमरावती येथे लवकरच नाथसमाज सभागृहाची उभारणी करण्याचा शब्द त्यांनी दिल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार,विदर्भ समिती अध्यक्ष श्री दिवाकरनाथजी गौरकर,अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेश नाथजी जाधव ,विनोद नाथजी चव्हाण ,अंकुश नाथ जाधव, संतोषनाथजी चिलवंत,नितीन अखतकर ,गजाननजी इंगळे साहेब,भर्तरीनाथ गौरकर,सुधाकरनाथ गौरकर ,सत्यजित वाडेकर , भुषण वाणे,प्रणव गौरकर तसेच इतर बरेच नाथबांधव उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या