Ticker

6/recent/ticker-posts

राजेश्वर मंदिरासाठी 25 कोटी रुपये देण्यात यावे- आ.सावरकर 

राजेश्वर मंदिरासाठी 25 कोटी रुपये देण्यात यावे- आ.सावरकर 


अकोला- अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर मंदिरासाठी 25 कोटी रुपये दोन टप्प्यात देऊन मंदिर परिसराचा विकास करण्यात यावा तसेच  बांधण्यासाठीजिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामासाठी  किमान 15 लाख रुपये देण्यात अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज राज्यस्तरीय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे केली .तसेच  अकोल्यातील राजराजेश्वर या प्राचीन व अकोल्याचे ग्रामदैवत व या परिसरातील श्रद्धास्थान असलेले जागृत व पौराणिक मंदिराचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २ टप्प्यात किमान 25- 25 कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी सुद्धा आमदार सावरकरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे केली असता याबाबत पालकमंत्री वित्तमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊन निधि उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगीतले.


अकोला जिल्ह्यात अंगणवाडीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने सव्वा अकरा लाख रुपये मंजुरीची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे ती वाढून ग्रामीण भागातील व अंगणवाडी मध्ये येणाऱ्या  बालकांची सोय करण्यात यावी  बांधकाम विभागाचे दर सूची तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंगणवाडीच्या आराखड्याप्रमाणे बांधकाम करावयाचे झाल्यास किमान 15 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकरांनी तांत्रिक बाब लक्षात आणून दिली, त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत 15 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली असता वित्तमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत चर्चा करून खर्चाच्या रकमेची निश्चिती करण्यात येईल व त्याप्रमाणे मंजुरी देण्यात येईल असे आश्वास केले. तसेच अकोला येथील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन व पौराणिक परंपरा लाभलेले अकोला शहराचे वैभव असलेले राज राजेश्वर मंदिराच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत 25 लाख रुपये निधी मंजूर करून त्याद्वारे विकास आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येईल त्याकरिता 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याबद्दल आमदार सावरकर यांनी समस्त अकोलेकरांच्या वतीने आमदार अजितदादा पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. परंतु राज राजेश्वर मंदिराचा पर्यटनाच्या दृष्टीने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान विकसित करण्याच्या दृष्टीने करावयाच्या विकास कामापोटी किमान 50 कोटी रुपये नियोजन समितीमार्फत देण्यात यावेत अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी आजच्या राज्यस्तरीय नियोजन मंडळाचे बैठक केली असता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चेअंती या मंदिराच्या पर्यटन विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून घेण्यात येईल असे बैठकीत आश्वस्त केले. महत्त्वाच्या विषयाला सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार अजित दादा पवार देणार असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला. यामुळे अंगणवाडी व लाखो शिवभक्तांची श्रद्धास्थान असणारी राजराजेश्वर परिसराचा विकासाचा मार्ग सुकर होणार आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या