प्रभू श्री राम आमचे दैवत त्यांचा अवमान कधीही सहन करणार नाही - विजय अग्रवाल
सडक्या मेंदूच्या जितेंद्र आव्हाडा वर मोक्का अंतर्गत कारवाई करा.
माजी महापौर विजय अग्रवाल यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
सुळे गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या - अगरवाल
=============================
अकोला / प्रतिनिधी
अखंड हिंदुस्तानातील आणी जगभरातील हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांच्या विषयी बोलताना सुप्रिया सुळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे जंगलात जाऊन जनावरांची शिकार करून मास खायचे अशी वादग्रस्त भाष्य करून अवमानकारक जहरी टीका करून देशभरातील आणि जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या असून प्रभू श्रीराम हे आमचे देव आहे त्यांचा अवमान आम्ही कदापिही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया जी महापौर माजी महापौर व पश्चिम अकोला विधानसभा प्रमुख भाजप नेते विजय अग्रवाल यांनी दिली. पुढे बोलताना अगरवाल यांनी की सुळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यात किडे पडलेले असून ते सतत सामाजिक समतोल बिघडून राज्यभरात आणि देशभरात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात असतात या जितेंद्र आव्हाड वर मोक्का अंतर्गत देशद्रोहाचा खटला दाखल करूनकारवाई करण्याची विनंती माजी महापौर विजय अग्रवाल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली असून अग्रवाल सुप्रियाताई सुळे यांनाही विनंती करून जितेंद्र आव्हाडांना पक्षातून हकलण्याची विनंती केली आहे. पुढे बोलताना माजी महापौर व अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख अग्रवाल धमकी वजा इशारा देताना जर तातडीने कारवाई झाली नाही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या