दोघे भाऊ गेले कबूतर पकडण्यास, छोटासा संशय अनं संपले चिमुकल्याचे आयुष्य
अकोला- जिल्हात खुनाच्या नवनवीन हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. कधी छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून कुणाला मारलं जातं, कधी कुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात, किंवा कळत- नकळत कुणी मारलं जातं. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे घडलेली घटना हृदयद्रावक आहे. जिथे कबुतरामुळे एका मुलाला जीव गमवावा लागला. पिंजर येथील रहिवासी असलेला सात वर्षांचा मुलगा 15 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही.अखेर एलसीबीने घटनेचा तपास करून अफानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळविले. यानंतर मृतदेह शव विच्छादनासाठी पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतर पोलिसांना मुलाची हत्या झाल्याची माहिती मिळाली.
घटनेची गंभीर दखल घेत नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनीही घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेतील संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमध्ये पिंजर येथील शेख अफान शेख अयुब या सात वर्षीय मुलाचा चुलत भाऊ 17 वर्षीय विधी संघर्ष याच्या हत्तेचे प्रकरण समोर आले आहे. मुलाचा मृतदेह शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत आढळून आला. मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्यामुळे पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी बेपत्ता बालकाच्या घटनास्थळी स्वत: भेट देऊन पाहणी केली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पिंजर पोलीस ठाण्याचे एसएचओ राहुल वाघ घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत होते. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हत्तेचे कारण आले समोर-
विधी संघर्शग्रस्त 16 वर्षाचा त्याचा चुलत भाऊ आणि मयत शेख अफान वय 7 वर्ष हे कबुतरे पकडण्यासाठी विहिरी शेजारील झोपडीत गेले असता, विहिरी शेजारील झोपडीत त्याने अफान ला कबूतर पकडण्यासाठी खिडकीजवळ बसवले. परंतु कवचाच्या आतून एका कबुतराला झोकून दिले आणि कबूतर उडून गेले, परंतु मयत अफानला लहान मूलाने जाणूनबुजून उडत असल्याचा संशय आल्याने त्याने त्याचा गळा दाबून त्याला ढकलले, त्यामुळे तो पडला. खिडकीला लागून असलेल्या विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.
यांनी केली कारवाई-
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेद्रं मलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार, एजाज अहेमद, आकाश मानकर, धिरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल वौधरी, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.
0 टिप्पण्या