जुलमी नवीन मोटार कायदा रद्द करा. कारंजा काँग्रेस पक्षाची मागणी
कारंजा लाड -- वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने एका निवेदनाच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदारामार्फत दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे कि केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्यांमुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी नुकताच संप पुकारला होता, या संपाला काँग्रेसने आपला पाठिंबाही घोषीत केला होता. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने केली आहे
दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला असुन या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे.
या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी असुन हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असुन हा काळा कायदा मोदी सरकार ने रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने केली आहे
निवेदन सादर करते वेळी कारंजा शहर काँग्रेस अध्यक्ष अमीर खान पठाण, ॲड. संदेश जैन जिंतुरकर, विठ्ठलराव अवताडे, ॲड. वैभव लाहोटी, अक्षय बनसोड, प्रफुल्ल गवई, नुरमहम्मद, सागर इंगळे, असलम खांन, अन्सार भाई उपस्थित होते
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या पुढाकाराने वाशिम येथे भव्य चर्मकार समाज बांधव मेळाव्याचे येत्या रविवारी आयोजन
वाशिम : शासनाच्या व महामंडळाच्या विविध योजना चर्मकार समाज बांधवांपर्यंत पोहचवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच चर्मकार समाजाचे सामाजिक उत्थान, सामाजिक समरसता तसेच चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोणातून गुरु रविदास विश्व महापीठ भारत जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये हे महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणार आहे.तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने चर्मकार समाज बांधवांनी उपस्थित राहावे.असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी.व्ही.भागवतकर यांनी केले आहे.
येत्या रविवारी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
कारंजा तालुका प्रतिनिधी-येत्या रविवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय,कारंजा येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे.
स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय कारंजा या महाविद्यालयाचे सुरुवातीचे नाव विद्याभारती वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय कारंजा हे होते. या महाविद्यालयात 1983 पासून तर 2023 पर्यंत शिकत असलेल्या सर्व वरिष्ठ महाविद्यालक्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 7 जानेवारी रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर माजी विद्यार्थी मेळाव्याला या काळातील सर्व प्राध्यापक तसेच या काळातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्याची रूपरेषा खालील प्रमाणे आहे. नऊ ते दहा वाजेपर्यंत नोंदणी,दहा ते अकरा उद्घाटन, अकरा ते साडेबारा पर्यंत जे माझी विद्यार्थी वरिष्ठ पदावर आहे त्यांचे प्रेरणादायी मनोगत, साडेबारा ते दिड वाजेपर्यंत जेवण, दीड ते साडेतीन पर्यंत माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, साडेतीन वाजता समारोप कार्यक्रम.
तरी ज्यां माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी रविवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक देवरे तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर राऊत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देवानंद बोन्ते व सचिव प्रा.अतुल बर्डे, उपाध्यक्ष विलास कथले, कोषाध्यक्ष सुरेश गुगलिया, प्रसिद्धी प्रमुख विजय भड व सर्व सदस्य यांनी केले आहे.
गौतमनगरशी जोडणाऱ्या रस्त्याला तात्काळ मंजूरी देवून विकास निधी उपलब्ध करा. पिरिपाची मागणी
कारंजा : के. एन. कॉलेज - भिमनगर - श्रीमती एम.आर. नागवाणी हायस्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेज- मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतमनगर - शांतीनगर - लक्ष्मीनगर ते नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हायवेपर्यंत रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित करणेबाबत मागील १६/०३/२०२० व १३/११/२०२० ला मुख्याधिकारी नगरपरिषद कारंजा व लोकप्रतिनिधीस निवेदन सादर केले होते. निवेदन दिल्यानंतर नगर परिषद कारंजा यांचे नगर अभियंता सुधाकर देशमुख यांनी लोकप्रतिनिधीसह सदर रस्त्याची स्थळदर्शक पाहणी केली व सदर रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करुन मंजूरी करणेस्तव पाठपुरावा करण्यात येईल व रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे सांगितले होते. परंतू अद्यापपर्यंत सदर रस्त्याच्या कामात मंजुरी न मिळाल्यामुळे दि.२५/१२/२०२३ रोजी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेंद्र पाटणी हे बंजारा कॉलनी कारंजा लाड येथे काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजनानिमित्त आले असता त्यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी त्यांची भेट घेवून सदर रस्त्याचे काम प्रस्तावित करणेबाबतचे निवेदन देवून त्यांच्यासोबत विविध जनहितार्थ विकास कामाच्या बाबत चर्चा केली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, के. एन. कॉलेज - भिमनगर - श्रीमती एम.आर. नागवाणी हायस्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेज- मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतमनगर - शांतीनगर - लक्ष्मीनगर ते नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हायवेपर्यंत विकास आराखड्यामध्ये १५ मीटरचा डी.पी. रस्त्ता आहे. त्यापैकी गौतमनगरला जोडणार्या पोचरस्त्याचे बांधकाम व काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतू के. एन. कॉलेज - भिमनगर ते शांतीनगर - नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औंरंगाबाद) जन्नत द्रुतगती महामार्गपर्यंत रस्त्याचे काम होणे बाकी आहे. त्या रस्त्यास निधी उपलब्ध करुन रस्त्याचे बांधकामास मंजुरात देणेबाबत परिसरातील रहिवास्यांनी लोकप्रतिनिधी, नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले होते. परंतू निवेदन सादर केल्यानंतर सदर मागणी केलेल्या रस्त्याची स्थळदर्शक पाहणी केल्यानंतर लवकरात लवकर अंदाजपत्रक सादर करण्यात येईल व त्या अनुषंगाने पाठपुरावा सुद्धा करण्यात आला परंतू आजपर्यंत रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरीकांचे मागणी स्थळ व नागरिकांचे हित लक्षात घेता दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर मंजूर करुन सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळेस आमदार राजेंद्र पाटणी यांनी तेथे उपस्थित असलेले नगर अभियंता विजय घुगरे यांना सदर रस्त्याची पुन्हा स्थळदर्शक पाहणी करुन नियमानुसार रस्त्याचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करणेबाबत सांगितले.
आजरोजी तालुक्यामधून ये-जा करणारे नागरीक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शेतकरी, प्रवासी वाहने शहरातील मुख्य रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस कारंजा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता व रस्त्यावरील नागरीकांची गर्दी व वर्दळ लक्षात घेवून निवेदनातील रस्त्याचे बांधकामास मंजुरी देऊन रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यास या महावीर ब्रह्मचारी आश्रम ते दिल्ली गेट पर्यंत मुख्य रस्त्यावरची वर्दळ कमी होईल.दिवसेंदिवस रस्त्यावर होणार्या अपघाताची संख्या लक्षात घेता त्याची तीव्रता सुध्दा कमी होईल. तसेच त्या परिसरामधून कॉलेजमध्ये ये-जा करणार्या विद्यार्थी - विद्यार्थीनीं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री करण्याकरीता येणारे शेतकरी यांना शहरातील मुख्य रस्त्याने ये-जा न करता या रस्त्याने ये-जा करणे सोईचे होईल तथा शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ व गर्दी कमी होवून अपघाताची तीव्रता कमी होईल. त्यामुळे सादर केलेल्या निवेदनानुसार रस्त्याचे बांधकाम संबंधित विभागास प्रस्तावित करण्याचे आदेश देवून सदर रस्त्याच्या बांधकामास निधी उपलब्ध करुन देण्यात यावा,याबाबतचे निवेदन परिसरातील नागरीकांच्या मागणीस्तव पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी सादर केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487






0 टिप्पण्या