न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे महाराष्ट्र पोलीस उदय दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
किशोरवयीन विद्यार्थांसाठी विशेष कायदेविषयक कार्यक्रमाचे आयोजन दि.४जाने.२४ ला न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे मुनशी सरांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.यावेळी रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे व कावेरी ढाकणे अंमलदार, किरण मुळतकर पोलीस हेड कॉन्स्टेबल, अमोल गिरी पोलीस नाईक यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक विज्ञान रेलकर सर तर प्रमुख अतिथी म्हणुन पर्यवेक्षिका सौ.दंडे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आर एस पी विभागाचे प्रा.श्रीकांत रत्नपारखी यांनी तर आभार प्रदर्शन आर एस पी विभागाच्या कु.अर्चना रंजनकर मॅडम यांनी केले. महिला पोलीस उपनिरीक्षक पुंडगे मॅडम यांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅट टच तसेच छेडखानी, ऑनलाइन ,मोबाईलच्या माध्यमातून कुणी त्रास देत असेल तर त्याची रितसर तक्रार दाखल करुन भविष्यातील गंभीर समस्या वेळीच टाळावी याचे मार्गदर्शन केले तर कायदा व सुव्यवस्था पोलीस मदत कक्षाचे टोलफ्री क्रमांक याबद्दलचे मार्गदर्शन कावेरी ढाकणे महिला पोलीस अंमलदार यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रेलकर सरांनी विद्यार्थांनी ऑनलाइन, फेसबुक,इ फसव्या जाहिरातींपासून दुर रहावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातवळणे सर उज्जनकर सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या