Ticker

6/recent/ticker-posts

राहुल नार्वेकर यांचा निकाल ऐतिहासिक-आ. सावरकर 

राहुल नार्वेकर यांचा निकाल ऐतिहासिक-आ. सावरकर 



शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष मा. @rahulnarwekar यांनी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. संसदीय लोकशाही अधिक मजबूत करणाऱ्या या निकालाचे सर्वच लोकशाहीप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. अशी प्रतिक्रियाभाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.

स्वतःच्या पक्षाची घटनादेखील माहीत नसणाऱ्या लोकांच्या बळावर उद्धव ठाकरेंनी कांगावा केला. माननीय विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या सविस्तर निकालपत्रामुळे उद्धव ठाकरेंचा कांगावा उघडा पडला. अशा शब्दात भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार @mieknathshindeच आहेत, हे आजच्या निकालाने जगासमोर आले प्रतिक्रिया आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केली तर हा निकाल ऐतिहासिक आणि अपेक्षित व सर्वांना न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकले, विजय अग्रवाल तेजराव थोरात किशोर पाटील जयंत मसने, अनुप धोत्रे अशा अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या