शिवसेना शिंदे गटाचा शहरात विजयाचा जल्लोष..!
शिंदे सरकार पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करणार :-तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे
प्रतीनीधी संतोष माने
मूर्तिजापूर:-शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.या बहुचार्चित निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.
शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे यांच्या मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. तर "शिवसेनेचा विजय असो -शिवसेना जिंदाबाद -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असो अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे, महिला तालुका प्रमुख स्मृती सुतारे, सुनील शिंदे, सुधाकर गोपकर, शरद हेंगड, राजू मेहेरे, उमेश चिंते, अमोल वानखडे, रवी शितोळे, अशोक सुतारे, प्रविण भटकर, गोपाल लाडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूर्तिजापूर तालुक्यात जिल्हातील शिवसेना शिंदे गटाची पहिल्या शाखेचे उदघाटन...!
अकोला प्रतिनिधी:संतोष माने:
मूर्तिजापूर:- पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ते ने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे असून, प्रत्येक गावात व सर्कल मध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करा, व घरोघरी आपला भगवा फडकून आगामी निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रोवावा असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव सर्कल मधील शिवसेना शिंदे गटाची शाखेचे उदघाट्न मोठ्या थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे जिल्हातील ही सर्व प्रथम शाखा असल्याचे समजल्या जाते.
या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे व महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योतीताई सुतारे यांच्या मार्गदर्शनात प्रहार संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अमोल वानखडे यांच्या सह शेकडो का कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आल्याने प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागणार असून शिवसेना शिंदे गटाची मूर्तिजापूर परीक्षेत्रात ताकद बळकट झाल्याचे बोलल्या जात आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मजबुती करीता शिवसेना शिंदे गटाने कसली असून जिल्हातील पहिल्या शाखेचे उदघाट्न मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, नानकसेठ नेभनानी,महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक, शशिकांत चोपडे, शहर प्रमुख गायकवाड, जगजीतसिंग विरक, यांच्या प्रमुख उपस्थित शाखा फलकाचे अनावरान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद-नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दिपक दांदळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रतिक कुऱ्हेकर यांनी कळविले.
----------------------
पोही येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न.
हजारोंच्या संख्येने उपासक व उपाशी का यांची उपस्थिती.
तालुका प्रतिनिधी
मुर्तीजापुर तालुक्यातील माना येथून जवळच असलेल्या ग्राम पोही येथे वर्षावासापासून सुरू असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम आज दिनांक 7 जानेवारी रोजी संपन्न झाला.
या धम्मग्रंथ पाटलाचा सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोहे येथील सरपंचा दीक्षा किशोर नाईक ह्या होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, संगीता आढाव, मायाताई नाईक, रिजवाना परवीन शेख मुख्तार, योगिता ताई रोकडे, आम्रपाली खंडारे, आम्रपाली तायडे, डी एस ननीर, सुनील भाऊ तामखाने,, संजय नाईक, सुनील सरदार, संजय रौंदळे, जी एन डोंगरे, किशोर नाईक, इत्यादी मान्यवरांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमात आदर्श यांना त्रिवार वंदन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर नाईक यांनी करून उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केली. त्यात शेख मुख्तार, मोहन रोकडे, सुनील सरदार, प्रतिभा अवचार, डी एस ननीर, यांनी धम्म विषयक सामाजिक दृष्ट्या संघटनात्मक मोलाचे मनोगत व्यक्त केले. मिलिंद इंगळे व प्रमोद देंडवे यांनी आपल्या मनोगत आतून आजची राजकीय स्थिती लक्षात घेता, उपस्थितांना उद्देशून स जगता बाळगून योग्य दिशादर्शक मुलाचे आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मुर्तीजापुर तालुक्यातील पदाधिकारी व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील उपासक उपासिका कार्यकर्ते तसेच प्रत्येक गावातील बहुसंख्या लोक काही सरपंच माजी सरपंच आणि पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपाशी का आणि मंडळींची अधिक प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच किशोर नाईक यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या