Ticker

6/recent/ticker-posts

राज्य शासनातर्फे २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर!

राज्य शासनातर्फे २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर!

अकोला
देशभरात मोठ्या उत्साहात अयोध्या येथील राम लल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे हा उत्सव मोठ्या हर्षउल्हासात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी सर्व शासकीय निमशासकीय तसेच शाळा कॉलेज ला राज्य शासनातर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागातर्फे उपसचिव रोजी कदम पाटील यांनी सार्वजनिक सुट्टीचे पत्र काढून राज्यातील जनतेला कळविले आहे.
22 जानेवारी रोजी आयोध्या येथील श्री राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराचा शुभारंभ होत असल्यामुळे राज्यातील विविध संघटनेमार्फत तसेच शासनाला वारंवार 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी होत होती. भारतीय जनतेच्या भावना श्रीराम यांच्याशी जुळलेल्या असून भारतीय नागरिकांना प्राणप्रतिष्ठे वेळी विधिवत व पुजा अर्चना करण्यासाठी सार्वजनिक सुट्टीची विनंती करण्यात आली होती. राज्यशासनाने सार्वजनिक सुट्टीचे आज पत्र निर्गमित करून श्रीराम भक्तांचा आनंद द्विगुणित केला आहे.

शिक्षण संचालनालय यांचे 👆 सार्वजनिक सुट्टी बाबत चे पत्र


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या