कारंजा. :
कारंजा येथे दि.१० डिसेंबर २०२३ रोजी शेतकरी निवास येथे संत मालिकेतील अग्रणी असलेले श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व संत संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. मा.आ.रामदासजी आंबटकर,आ.राजेंद्रजी पाटणी कारंजा-मानोरा मतदारसंघ,मा.अमोल पाटणकर अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई, श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा,मा. शिवदासजी सूर्य पाटील अध्यक्ष महा.प्रांतिक तैलीक महासभा वाशिम,सौ.मधुराताई वैभव लेंधे अध्यक्ष विश्वमांगल्य विदर्भ प्रांत,सौ मायाताई रुपेश वाघमारे महिला जिल्हाध्यक्ष भाजपा,विजयभाऊ गुलवाडे कारंजा, अनिलभाऊ खोरगडे कारंजा, संजयभाऊ क्षीरसागर कारंजा इत्यादी पाहुणे उपस्थित होते.या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा.चंद्रशेखरजी बावनकुळे समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्व समाज एकत्रित येऊन काम केले पाहिजे तरच आपला समाज पुढे जाईल,समाजातील गरीब परिवाराला सर्वांनी मदत केली पाहिजे. त्यांची दिवाळी साजरी केली पाहिजे,मा.आ.राजेंद्रजी पाटणी यांनी सुद्धा जागा उपलब्ध असेल तर मी समाज भवनासाठी मोठा निधी उपलब्ध करून देईल. असे आपल्या मनोगतातून सांगितले. मा.अमोलभाऊ पाटणकर यांनी सुद्धा विविध योजनेची माहिती देऊन समाजाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन झंझाट यांनी केले. प्रास्ताविक किरण क्षार यांनी केले.आभार प्रदर्शन प्रशांत बिजवे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य तेली समाज बांधव व महिला मंडळीची उपस्थिती दिसून आली. त्यामुळे कारंजेकर तेली समाजाची उल्लेखनीय एकजूट येत होती.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या