जिल्हा रूग्णालयात रूग्नांना औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड, अधिवेशनात सखोल चौकशी केली मागणी
अकोला
नागपूर येथील चालू हिवाळी अधिवेशनात राज्यात क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याकरीता औषध पुरवठा व चाचणी किट उपलब्ध करुन देणेबाबत चा प्रश्न क्रमांक (६) ७१७५९ अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यात क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी शासनाने मोहिम हाती घेतली असतानाही ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत, तसेच मुंबईत क्षयरोगाचे निदान लवकर होण्यासाठी आधुनिक सीबीनॅट मशीनचा (जीन एक्सपर्ट) वापर सुरु असून अवघ्या दोन तासात टीबीचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे यातून निदान होते, परंतू दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रोजीपासून पालिकेच्या टीबी डॉट्स केंद्रावरील चाचणी किटअभावी ट्रेनॅट आणि सीबीनॅट मशीन्स विनावापर पडून असल्याने XDR आणि MDR चे रुग्ण ओळखणे कठीण झाले आहे, तसेच राज्यात बहुतांश ठिकाणी क्षयरोगावरील आवश्यक औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना ही औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, या बाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करून शासनाने काय कार्यवाही केली किंवा करण्यात येत आहे अशा आशयाचा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढे उपस्थित केला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी राज्यात क्षय रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून असल्याचे अंशत: खरे आहे असल्याचे सांगितले. तसेच मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीला भारत सरकारच्या केंद्रीय क्षयरोग विभागाकडून सीबीनॅट व टूनॅट कार्टीजेसचा पुरवठा करण्यात येतो.
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या अखत्यारीतील निदान व उपचार केंद्रांमध्ये सर्व संशयित रुग्णांची तपासणी मुख्यत्वे NAAT मशीन्सद्वारे (Upfront NAAT) करत असून मार्गदर्शक सूचनेनुसार क्षयरुग्णांच्या निदानासाठी diagnostic algorithm वापरण्यात येतो. यामध्ये गरजेनुसार स्मीअर मायक्रोस्कोपीवरही क्षयरुग्ण चाचणी केली जात आहे. तसेच लाईन प्रोब असे (LPA) आणि लिक्विड कल्चर (LC) या चाचण्यांद्वारे INH आणि Rifampicin या औषधांची संवेदनशीलता तपासली जाऊन क्षयरुग्णांचे निदान XDR आणि MDR असे करण्यात येते. यामुळे क्षयरुग्णांच्या निदान व उपचारामध्ये कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
राज्याला भारत सरकारच्या केंद्रीय क्षयरोग विभागाकडून क्षयरुग्णांकरीता औषधे मिळतात. कोणत्याही कारणास्तव औषधांचा तुटवडा असल्यास केंद्रीय क्षयरोग विभाग राज्य क्षयरोग कार्यालयाला स्थानिक स्तरावर खरेदी करण्यास परवानगी देते आणि राज्य क्षयरोग कार्यालय, मुंबई शहर व इतर सर्व जिल्हयांतील टीबी कार्यालयास खरेदीची परवानगी आणि अनुदान वाटप करते.
राज्यात काही काळ औषध प्रतिरोधी रुग्णांसाठी ( MDR रुग्ण) आवश्यक असणाऱ्या ठराविक काही पुरवठा केंद्रीय क्षयरोग विभागाद्वारे उशिरा प्राप्त होत होता. त्यामुळे सर्व जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी यांना स्थानिक पातळीवर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच इतर आवश्यक असणाऱ्या सर्व औषधांची मुबलक प्रमाणात खरेदी करण्यात आलेली असून सदर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यास्तव रुग्णांना ही औषधे बाहेरुन विकत घ्यावी लागत नाही असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी आपल्या उत्तरात सागितले.
0 टिप्पण्या