कुंभारी येथील सर्वसामान्य युवकांनी बनवला लघुचित्रपट
मौजे कुंभारी येथील युवकांची यशाकडे पाऊलवाट, कुंभारी येथील सर्वसामान्य युवकांचा घ्यायला हवा आदर्श
अकोला महानगर पालिकेच्या हद्दीत येतं असलेले शिवणी नजिक कुंभारी येथील युवकांनी बनवला “काळोख” लघुचित्रपट. व त “काळोख” या लघुचित्रपटाचे भित्तीपत्रिका प्रक्षेपण पोस्टर लाँचिंग जेष्ठ अभिनेत्री सौ. अलका कुबल यांच्या हस्ते दिनांक 27 बुधवार संपन्न झाले.
सदर लघुचित्रपटाचे दिग्दर्शन ऋषी इंगळे,धीरज इंगळे व सागर इंगळे यांनी केले आहे, या लघुचित्रपटाला स्व. डॅडी देशमुख शॉर्टफिल्म फेस्टिवल मधे सर्वोत्कृष्ट २० चित्रपटांमध्ये स्थान मिळाले आहे आणि २६ डिसेंबर २०२३ ला होटल सेंटर प्लाझा येथे प्रदर्शन देखील करण्यात आला. हा लघुचित्रपट फक्त मोबाईल फ़ोन च्या सहाय्याने चित्रांकित केला आहे हे विशेष, मुख्य भूमिकेत दिवाकर पोहनकर, राजकमल तायडे, श्री. सुरेश इंगळे, श्री. गजानन अतकरे, विनोद ठोंबरे, गोपाल टापरे, मालती शामस्कर, सुनीता तायडे, महादेव शिरसाट, व पुजा इंगळे आदि कलाकार आहेत, पोस्टर लाँचिंग समारंभात जेष्ठ अभिनेत्र्या अलका कुबल, अध्यक्ष नारायणराव गावंडे, सदस्य मनोहर पांडव, श्रीकृष्ण बिरकड, माजी सरपंच बाळासाहेब अतकरे, प्रा. तुकाराम बिरकड संस्थापक जय बजरंग मंडळ कुंभारी, प्राचार्य विलास इंगळे, मुख्याध्यापक दिनकर धामणकर, पंकज फाले, पं.स. सदस्य विजय बाभुळकर, उपसरपंच राजकुमार क्षीरसागर व ग्रामपंचायत सदस्यआदींची उपस्थिती होती. यावेळी मा.तुकाराम बिरकड यांनी प्रस्ताविकातून संस्थेचा लेखाचोखा मांडला. संचालन प्रा. श्रीराम पालकर यांनी केले. व या समारंभासाठी प्रकाश बिरकड, संजय तायडे, रमेश अढाऊ, प्रा. दिलीप अप्तुरकर,प्रा. अशोक राहाटे, प्रा. अशोक भराड, प्रा. अपर्णा खुमकर, प्रा. शारदा बावनेर, अनिता खंडारे, प्रा. शारदा उमाळे, बजरंग गावंडे, प्रा. मंजुषा सपकाळ, प्रा. प्रफुल देशमुख, बबलू तायडे, शरद मैद, मीना आमले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन सौ. अलका कुबल यांनी केले.तसेच लघुचित्रपटात मुख्य भुमिकेत असलेले श्री सुरेश इंगळे यांनी परिश्रम घेणाऱ्या त्यांच्या सर्व टीम चे आभार मानले..
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या