काटीपाटी बॅरेज प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी
अकोला 2023 च्या शेवटच्या चार दिवसाआधी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी करणारा व लाखो हेक्टर शेती सिंचनाच्या खाली येणार असणारा महत्त्वकांक्षीपूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आज नियमक मंडळाच्या बैठकीत 454.62 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी दिली, आमदार रणधीर सावरकर यांनी समस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने तसेच जिल्हा वासियांच्या वतीने नामदार फडणवीस आभार..मानले.
खारपाण पट्ट्याला वरदान ठरणारा आणि या भागातील शेतीला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करून देणारा काटेपाटी प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असून खारपाणपट्टीतील शेतकऱ्यांना सिंचन आणि आर्थिक दृष्ट्या दिलासा देणार आहे , आज झालेल्या नियमक मंडळाच्या बैठकीत नामदार देवेंद्र फडणीस यांनी पुर्णानदीवरील काटीपाटी बॅरेज संग्रह प्रकल्पाच्या सुमारे 454.62 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी प्रदान केली , या प्रकल्पाची प्राथमिक मंजुरी प्रस्तावास रु.६४.३२ कोटीचा प्रशासकीय मान्यता प्रस्तावास दि. १४/०७/२००९ रोजी मान्यता प्राप्त झाली होती. या प्रकल्पास केंद्रीय मंत्री ना. नितीन जी गडकरी यांनी जलशक्ती मंत्रालयाकडून बळीराजा जलसंजिवनी योजनेअंतर्गत ३३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, प्रकल्पाच्या रु.३४०.६० कोटीचा सुप्रमा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यावर शासनाच्या दि.२८ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये CDO, Nashik मार्फत प्रकल्पाच्या संकल्पनाचे Vetting करुन घेण्याच्या सुचना प्राप्त होत्या. रा. ता.सं. सं नाशिक यांच्या दि.०८ डिसेंबर २०२२ च्या पत्रान्वये सुप्रमा प्रस्तावातील उपस्थित त्रुटीची पुर्तता करून घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकरांनी सतत पाठपुरावा केला,. प्रकल्पाच्या कामास अद्याप सुरवात झालेली नसुन सुप्रमा प्राप्ती नंतर प्रकल्पाचे कामास सुरवात करून जुन २०२५ पर्यंत प्रकल्प पुर्ण करण्याचे नियोजीत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ८.२४ द.ल.घ.मी. पाणीसाठा व १८०० हे. सिंचन क्षमता निर्मिती होईल. प्रकल्पावर सन २०२२-२३ करीता एकुण रु.१०.०० कोटी तरतुद उपलब्ध असुन नोव्हेंबर २०२२ अखेर एकूण रू.२.६१ कोटी इतका खर्च झालेला आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला आलेले यश आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांचा लाभ देण्यासाठी दिलेली मंजुरी याकरिता समस्त शेतकऱ्यांनी आमदार सावरकर ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रती जाहीर आभार व्यक्त केले.चौकट खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला व विकास पुरुष केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी या कामाला मंजुरी दिली व पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला यासंदर्भात सातत्याने अकोला पश्चिम विदर्भातील अभ्यासू नेतृत्व व सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वेदना संवेदना त्यांच्या समस्या व प्रामाणिकपणे सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने लोकशाहीतील विधिमंडळ राज्य सरकार केंद्र सरकार व सभागृहाच्या बाहेर सातत्याने प्रयत्नशील असणारे अभियंता शेतकरी नेते आमदार रणधीर सावरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यास यश प्राप्त केले आहे यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे नामदार अजित दादा पवार, यांचे आभार मानले आहे.अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पूर्णा नदीवरील बेरजेची शृंखला पूर्ण करतांनाच हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर सतत प्रयत्नशील होते त्यांनी पत्रव्यवहारांसोबत संसदीय आयुधे , लक्षवेधी ,तारांकित प्रश्न याद्वारे सतत पाठपुरावा केला ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभागाचा कार्यभार येताच त्यांनी या प्रकल्पाच्या सुधारित मान्यता प्रस्तावास मंजुरीसाठी विशेष आग्रह केला होता
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला व विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाला मंजुरी दिली व पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. यासंदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या वेदना संवेदना त्या- च्या समस्या व प्रामाणिकपणे सोडवण्याच्यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असणारे अभियंता शेतकरी नेते आमदार रणधीर सावरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यास यश प्राप्त केले आहे. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या