Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग बांधवांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन

दिव्यांग बांधवांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन


दिव्यांग बांधव निधीच्या लाभापासून वंचित

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
नासीर शेख 
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिर्ला ग्रामपंचायतने शासनाचे नियमाप्रमाणे दिव्यांगांना जो निधी वाटप करायचा असतो, तो अद्याप पर्यंत शासनाचे निर्देश असताना सुद्धा हा वाटप करण्यात आला नाही, त्यामुळे दिव्यांग बांधवांनी 7 डिसेंबर रोजी पातुर पंचायत समिती कार्यालय येथे दुपारी 12 वाजता पासून तब्बल दोन तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन करून सदर निधी वाटप करण्याची मागणी यावेळी केली आहे.
ग्रामपंचायतचे सदस्य सागर निरंजन कढोणे यांच्या नेतृत्वात सदरचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधव निधी वाटप बाबत कार्यालयामध्ये विचारणा करण्यासाठी जातात, तर तेथे त्यांना समाधानकारक उत्तरें न देता उडवा उडवीचे उत्तर देऊन अपमानित करण्यात येत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला असून,निधी वाटप करण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी गोपाल आवटे, शेख अफरोज शेख अल्लाउद्दीन, मोहम्मद फैसल , शिवचरण इंगळे, दगडू खरडे, सुमित बळकार, रमेश ढाळे, विशाल जाधव, रुमाना रसीद, रूपल इंगळे, सौ छाया मोरे, सौ निकिता निलखन, सविता इंगळे, प्रवीण सावरकर, कांचन मते, सुनिता गवळी, माधुरी वसतकार, सुरेंद्र उगले, अंश बोचरे, शेखर मोहिबुद्दीन, शेख रेहान जिलानी, अब्दुल रफिक , अलियार खान, राबनीशाह इमाम शाह, अलीम खान, शेख हुसेन शेख सलीम प्रवीण गवई, शेख रेहान,आदी बहुसंख्या दिव्यांग बांधव उपस्थित होते.



गटविकास अधिकारी अनुपस्थितीत 
पातूर पंचायत समितीत दीव्यांग बांधवांचा ठिय्या आंदोलन सुरू असतांनाच्या वेळी गट विकास अधिकारी अनुपस्थितीत असल्याने आक्रमक झालेले दिव्यांग बांधवांनी बेशरमची झाडे देऊन गट विकास अधिकारी यांचा अनुपस्थितीचा निषेध करण्यात आला,



आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे 
विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे आणि प्रहारचे कार्यकर्ते शुभम उगले, यांच्या मध्यस्थीने शिर्लाचे ग्रामसेवक
डीवरे यांना सूचना देऊन पत्र देण्याचे सांगितले, ग्रामसेवकानी सामान्य फंडातून दिव्यांगाना आश्वासन बाबतचे पत्र ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांना दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले, तीन तासापर्यंत ठिय्या आंदोलन
दिव्यांगाना त्यांचा हक्काचा निधी मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या दिव्यांगानी थेट पंचायत समितीत अडीच ते तीन तासापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होता,अखेर आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले,


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या