Ticker

6/recent/ticker-posts

हिवाळी अधिवेशनात सांस्कृतिक विभागामार्फत कलावंताना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाविषयी आवाज बुलंद करा. - लोककलावंत संजय कडोळे

हिवाळी अधिवेशनात सांस्कृतिक विभागामार्फत कलावंताना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाविषयी आवाज बुलंद करा. - लोककलावंत संजय कडोळे


 कारंजा (लाड) : "वाढती महागाई लक्षात घेऊन सांस्कृतिक विभागाकडून वयोवृद्ध कलावंताना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून सर्वांना दरमहा सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्यात यावे. त्याकरीता उपराजधानी नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून, कलावंताचे मानधन वाढवूनच घ्या. ह्या मागणी करीता,जिल्ह्यातील लोककलावंताची नावलौकिक प्राप्त एकमेव संघटना असलेल्या -विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत तथा संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे व कार्यकर्त्यांनी, नुकतीच वाशिम येथे, अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार अँड किरणराव सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. 


कलावंताच्या मानधन वाढी सोबतच, गेल्या पाच वर्षापासून जिल्हा वृद्ध साहित्यीक व कलाकार मानधन लाभार्थी निवड समिती नसल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून शासनाकडूनच कलाकारावर अन्याय होत असल्यामुळे जिल्हा वृद्ध कलावंत निवड समितीचे पालकमंत्र्या कडून त्वरीत गठण करावे. मानधन जिल्हा निवड समितीवर केवळ लोककलावंतानाच अशासकिय सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात यावी. आदी विषयावरही संजय कडोळे यांनी शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांचेशी चर्चा केली.तसेच चर्चेच्या प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन शिक्षक आमदार सरनाईक यांना हिवाळी अधिवेशात लोककलांवताच्या मागण्या उपस्थित करण्याकरीता शुभेच्छा दिल्यात.यावेळी वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार (पत्रकार) हे प्रामुख्याने चर्चेला उपस्थित होते.

लोककलावंताना दरमहा पाच हजार रुपये मानधन आणि जिल्हा निवड समिती मध्ये हाडाच्या लोककलावंतानाच स्थान मिळावे. - संजय कडोळे


 कारंजा (लाड) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून,जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणारी शासनाची "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना." केवळ साहित्यीक आणि परंपरागत लोककलाकार यांच्याच करीता राबविण्यात येत असते.परंतु शासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे,गेल्या पाच वर्षापासून सदर्हु योजना अंमलात आणण्याकरीता शासनाची "जिल्हा वृद्ध सहित्यीक कलाकार समिती" अस्तित्वात नसल्यामुळे जिल्ह्यातील लोककलावंत मानधनापासून वंचित असून कलावंताची परवड होत आहे.तसेच आज रोजी आमदार-खासदार आणि शासनाचे सरकारी निमसरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर ज्याप्रमाणे वाढत्या महागाईला अनुसरून वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता दिला जातो,त्याचप्रमाणे दुर्धर आजार ग्रस्त,वयोवृद्ध किंवा दिव्यांग लोककलावंत यांच्या दारिद्री परिस्थितीचा आणि वृद्धापकाळातील दुर्धर आजाराचा विचार करून शासनाने लोककलावंताच्या मानधनात महागाईच्या प्रमाणात वाढ करून, आजमितीला सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन दिले पाहीजे.तसेच महत्वाचे म्हणजे "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे" गठन करीत असतांना,ज्याला कला किंवा लोककला म्हणजे काय ? याचा अभ्यासच नसतो.अशा कोणत्याही अजाणत्या व्यक्तिंना किंवा राजकिय पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना निवड समिती मध्ये अशासकिय सदस्य म्हणून न घेता, खऱ्याखुऱ्या हाडाच्या लोककलावंतालाच जिल्हा कलाकार निवड समिती मध्ये "अशासकिय सदस्य" म्हणून पदावर घेतले पाहीजे.असे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी, तहसिलदार कुणालजी झाल्टे साहेब यांचे मार्फत शासनाला निवेदन दिल्यानंतर पत्रकाराशी बोलतांना सांगीतले.


याबाबतीत अधिक वृत्त असे की,गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाने लोककलांवताकडे अक्षम्य दुर्लक्ष्य करून त्यांच्या मानधन वाढीसह इतरही मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत. शिवाय पाच वर्षापासून वृद्ध साहित्यीक कलाकार समिती स्थापन न झाल्याने जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव पाच वर्षापासून मंजूर करण्यात आले नाहीत.त्यामुळे वयोवृद्ध कलावंता मध्ये शासनाविषयी तिव्र रोष व्यक्त करण्यात येत असल्याने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दि 24 जानेवारी 2024 रोजी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला असून,त्याकरीता विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांच्या नेतृत्वात बुधवार दि. 06 डिसेंबर रोजी तहसिलदार कुणालजी झाल्टे यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. त्यावेळी लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,कैलास हांडे, हभप माणिक महाराज हांडे , अश्विन जगताप इत्यादी हजर होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या