Ticker

6/recent/ticker-posts

नव्याने रुजू झालेल्या तहसिदार डॉ.अपूर्वाताई बासूर (आय ए एस) यांचे विदर्भ लोककलावंत संघटना आणि पत्रकार परिषदेतर्फे करण्यात आले स्वागत

नव्याने रुजू झालेल्या तहसिदार डॉ.अपूर्वाताई बासूर (आय ए एस) यांचे विदर्भ लोककलावंत संघटना आणि पत्रकार परिषदेतर्फे करण्यात आले स्वागत


 कारंजा (लाड) : कारंजा येथे सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी नव्याने तहसिलदार पदावर रुजू होऊन, डॉ . अपूर्वाताई बासूर (मॅडम) यांनी कारंजा तहसिल कार्यालयाचा प्रभार स्विकारला. 


ही माहिती मिळताच स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेतर्फे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकार संजय कडोळे,ग्रामिण पत्रकार जिनवर तायडे, उमेश अनासाने,विजय पाटील खंडार, अजाबराव ढळे इत्यादींनी तहसिलदार डॉ.अपूर्वाताई बासूर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नायब तहसिलदार विनोद हरणे सुद्धा उपस्थित होते. तहसिलदार डॉ.अपूर्वाताई आपल्या कार्यकाळात तिर्थक्षेत्र कारंजा नगरीतील,कारंजेकरांच्या समस्यांना न्यायहक्क मिळवून देतील.तसेच अवकाळी पावसाने अवसान गळालेल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून देतील असा आशावाद पत्रकार संजय कडोळे यांनी यावेळी व्यक्त केला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या