Ticker

6/recent/ticker-posts

संत गाडगे बाबा पुण्यतिथी कार्यक्रमाला मुंबई येथे उमेश अनासाने यांची प्रमुख स्वच्छतादूत म्हणून उपस्थिती

संत गाडगे बाबा पुण्यतिथी कार्यक्रमाला मुंबई येथे उमेश अनासाने यांची प्रमुख स्वच्छतादूत म्हणून उपस्थिती


 कारंजा (लाड) : कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष उमेश हरिभाऊ अनासाने हे बालपणा पासूनच विविधांगी समाजसेवेत सक्रिय असतात. विश्व हिंदु परिषदेकडून काढण्यात आलेल्या कारसेवेत आणि अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी आंदोलनात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच ते राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेचे महामंत्राचे महत्व जाणून स्वच्छता उपक्रमातही हिरीरीने सहभागी होत असतात. त्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरिय पुरस्कारही मिळाले आहेत.नुकतेच दि. 23 व 24 डिसेंबर रोजी मुंबई येथे घेण्यात आलेल्या कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतीथी समारोहात त्यांना प्रमुख स्वच्छतादूत म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः साफसफाई करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्याकरीता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        सविस्तर बातमी येथे👆 पहा....


जिल्हाधिकारी यांचेकडून पुढील वर्षातील स्थानिक सुट्टया जाहिर


वाशिम : सन 2024 या वर्षातील जिल्हयाकरीता 3 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी एका आदेशाव्दारे जाहिर केल्या आहे. त्यापुढीलप्रमाणे 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधन, 2 सप्टेंबर 2024 पोळा आणि 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा  गौरी पूजन ह्या आहे. ह्या सुट्टया जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू होणार नाही.असे प्रसिद्धीपत्रकात कळविण्यात आले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या