Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ


अकोला, दि. २९ : जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज झाला. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकासकामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉररूम स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

पालकमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, अव्वल कारकून व इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या