Ticker

6/recent/ticker-posts

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत भाजपा महिला आघाडी तर्फे विविध कार्यक्रम

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत भाजपा महिला आघाडी तर्फे विविध कार्यक्रम


अकोला नमो चषकच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा संवर्धनाचे काम करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने रांगोळी स्पर्धा आयोजित केली या रांगोळी स्पर्धेला जिल्ह्यात घराघरातून मातृ शक्तींचा समर्थन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी असलेली आपुलकी त्यांच्या कामावर असलेली गॅरंटी याच्यावर शिक्का मुहूर्त असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले. 


केंद्र शासनातर्फे आयोजित मोदीजींच्या विविध योजनांवर आधारित तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ  अंतर्गत अकोला भाजपा महिला आघाडी द्वारा आयोजित मध्य मंडळातील वर्धमान भवन,एस.पी. ऑफिस जवळ,येथे    सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ.मंजुषाताई सावरकर, सौ.पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.सीमाताई मांगटे पाटील, सौ.अर्चनाताई मसने,महिला मोर्चा महानगराध्यक्ष सौ.चंदा ताई शर्मा, सौ.सारिका ताई जयस्वाल, सौ.सुनिताभाभी अग्रवाल सौ.अर्चना भाभी शर्मा ,आणि बेटी बचाव बेटी पढाओ संयोजिका सौ. निखीताताई देशमुख, रांगोळी परीक्षक सौ.वंदना पींपळखरे आणि चंदना जैन,जान्हवी डोंगरे,चंदा ठाकूर, छाया तोडसाम, रश्मी कायंदे,निशा कढी ,निता बागडे,दीपिका ठाकूर,रविता शर्मा,दुर्गा जोशी,संतोष शर्मा ई.या सर्वांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने चंदा शर्मा वैशाली निकम कुसुम भगत सुमनताई गावंडे खेडकर राधिकाताई तिवारी, अश्विनीताई हातवळणे, स्मिता ताई राजनकर यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात मातृ शक्तींचा सहभाग लावत आहे.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी महेंद्र कायंदे तर आभार प्रदर्शन निशा कढी यांनी केले. या मंडळात साडेतीनशे महिलांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणाचा व सरकारच्या योजनेचा रेखाटन सुरेखपणे केले परीक्षकाच्या माध्यमातून पाहणी सुरू असून भाजपा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी सौ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात ठिकाणी भेटी दिल्या व मातृ शक्तींना शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या