कारंजा (लाड) : दरवर्षीप्रमाणे यंदाही "श्रीक्षेत्र कारंजा(लाड)ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव)" पर्यंतची,माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी आनंद पदयात्रा रविवार दि. 07 जानेवारी 2024 रोजी श्रीक्षेत्र कारंजा येथून श्रीक्षेत्र धामणगाव (देव) च्या दिशेने निघणार असल्यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण आहे, दरवर्षी माऊली दर्शनाने कारंजेकर नववर्षातील धार्मिक शुभ कार्याचा प्रारंभ करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वारकर्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश भाऊराव गढवाले यांनी केले आहे.याबाबत अधिक वृत्त असे की,सुमारे तेरा वर्षापूर्वी सन 2011 मध्ये, माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले,सुनिल गुंठेवार,राजेंद्र चव्हाण,उमेश अनासाने, रामेश्वर खानबरड देविदास कव्हळे, हभप भगवानदास खेमवाणी, संजय महाराज कडोळे,उमेश माहितकर, सुनिल माकृलवार, शंकर संकेत,राम गटागट,राजाभाऊ शेळके,श्रीपाद रेवाळे,राहुल गायकवाड,अरविंद गुंठेवार, विजय पाटील खंडार,तायडे,शर्मा,नितीन गढवाले, योगेश गढवाले, रुपेश गढवाले व इतरांनी एकत्र येत माऊली पालखी सेवा समिती स्थापन करून, "श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव)"पर्यंत,पालखी आनंद पदयात्रा सुरु केलेली होती.पहिल्या वर्षी केवळ सतरा वारकर्यांना सोबत घेऊन निघालेल्या रोपटयाचे (चिमुकल्या दिंडीचे) आज सन 2024 पर्यंत वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आजमितीला या पदयात्रेत अडीच ते तीन हजार वारकरी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात.
मध्यंतरी गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भिती वाटत असतांना सुध्दा माऊली सेवा समितीच्या वारकर्यांनी सुरु केलेली पालखी पदयात्रा खंडीत न होऊ देता निवडक वारकरी घेऊन, प्रशासनाच्या अनुमतीने सुरुच ठेवली होती.हे विशेष! मागील वर्षीच्या 2023 पासून मात्र मोठया जल्लोषात,वाशिम जिल्ह्यातील कारंजा(लाड)तालुक्यातील स्थानिक पहाडपुरा,टिळक चौक,कारंजा येथून माऊली सेवा समितीची ही पालखी पदयात्रा रविवार दि 7 जानेवारी रोजी, सकाळी 08: 30 वाजता धामणगाव ( देव) करीता पायदळ निघणार असून, प्रमुख परिक्रमा मार्गाने,टिळक चौक,श्री.मोठे राममंदिर श्रीरामनगर,श्री.दत्त मंदिर,श्री.शनि महाराज मंदिर,रामा सावजी चौक,श्री. गुरुमंदिर संस्थान,श्री.संत नामदेव महाराज मंदिर कानडी पुरा,अमोल सुरेश गढवाले यांचे निवास येथून कुंभारपूरा मार्गाने,दारव्हावेसी मधून गावा बाहेर पडून,श्रीक्षेत्र धामणगाव देव करीता रवाना होणार असून, मार्गात सोमठाणा,कामठवाडा, सांगवी रेल्वे,श्री सिद्ध रामनाथ स्वामी मठ संस्थान,रामगाव ( रामेश्वर ),येथून बोदेगाव येथे , माऊलीभक्त गजानन सुपलकर ( गोंधळी) वारकरी यांचेकडून दुपारची महाप्रसाद व्यवस्था राहील . त्याशिवाय मार्गात ठिकठिकाणी स्थानिक माऊली भक्त मंडळी चहापान अल्पोपहार व्यवस्था करणार असून श्रीक्षेत्र धामणगाव (देव) येथे पोहचल्यावर माऊली दर्शन महाआरती व महाप्रसाद घेऊन पालखी आनंद पदयात्रेचा समारोप होईल. तसेच दुसरे दिवशी 08 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता, माऊली सेवा समितिचे पालखी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले, पहाडपुरा यांचे निवासस्थानी माऊली भक्तांकरीता दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.असे वृत्त गढवाले परिवाराकडून कळविण्यात आल्याचे माऊली सेवा समितीचे स्वयंसेवक संजय कडोळे यांनी कळवीले असून,जास्तीतजास्त माऊली भक्त वारकरी यांनी पालखी आनंद पदयात्रेत शांती,संयम,श्रद्धा ठेवून स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होण्याचे आवाहन,भाविकांकरीता केले आहे.
अखेर हिवाळी अधिवेशनात सामाजिक न्याय विभाग-सांस्कृतिक विभागाच्या सर्वसामान्यांच्या प्रस्तावावर चर्चाच नाही
कारंजा (लाड) : महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा-विधानपरिषद आमदाराने अखेर,नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात, सर्वसामान्यांच्या हिताच्या सामाजिक न्याय विभाग,दिव्यांग कल्याण विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या योजना विषयी कोणतीही लक्षवेधी सूचना मांडलीच नाही.किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेच प्रस्ताव मंजूर केले नाहीत.गेल्या इ.सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकां नंतर शासनाने राज्यातील विकास महामंडळे, शासकिय-निमशासकिय पुनर्रचना करून,त्यांचे गठणच केलेले नाही. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक विभागाची सामाजिक कार्यकर्ता संमेलने- व्यसनमुक्ती साहित्य संमेलन झाली नाहीत.दिव्यांग कल्याण विभागाकडून तळागाळातील भूमिहिन-निराधार-दिव्यांग व्यक्तीकरीता संत गाडगेबाबा दिव्यांग घरकुल आवास योजनेच्या मंजूरीचा निर्णय झालेला नाही.महापुरुषांच्या स्मरणार्थ सामाजिक न्याय विभागाकडून दिल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार,कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्काराच्या वितरण सोहळ्याचे कार्यक्रम झालेले नाहीत. वाढत्या महागाईला अनुसरून निराधारांना संगायोचे अनुदान वाढवले जायला हवे असतांना त्यावर कोणताही निर्णय नाही. सांस्कृतिक विभागाकडून देखील, शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करणाऱ्या पथनाट्य व कलापथक कलाकारांच्या एकरकमी मानधनात वाढ नाही. राज्यभरातील लोककलावंताकडून सातत्याने मागणी होत असतांनाही,वृद्ध साहित्यीक कलाकार दरमहा मानधन योजनेची रक्कम वाढविण्यात आलेली नाही. आणि यातही महत्वाचे म्हणजे राज्यातील एकाही आमदाराने सर्वसामान्यांचे हे किरकोळ स्वरूपाचे विषय हिवाळी अधिवेशनात मांडले नाहीत. यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असणार . . ? थोडक्यात काय तर अधिवेशन काळात, ज्या ज्या योजना मधून मलाई मिळण्याची शक्यता असते. तिकडेच आमदारांचे लक्ष्य आहे की काय ? असी चर्चा सर्वसामान्यांनी करायला काय हरकत आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार जर सर्वसामान्याचे प्रश्न सोडविणार नसतील तर नाईलाजाने जनता जनार्दनाला सुद्धा आगामी सार्वत्रिक निवडणूकीवर एकतर बहिष्कार टाकावा लागेल.किंवा नोटाचा पर्याय निवडावा लागेल असा इशारा स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
संतश्रेष्ठ रविदास महाराजांना पुण्यतिथी निमित्त कारंजा येथे अभिवादन
कारंजा :
संतश्रेष्ठ श्री रविदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कारंजा येथे त्यांचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने नितीन राजगुरे यांच्या शिंदे- शहाकारनगर मधील निवासस्थानी दि.20 डिसेंबर 2023 रोजी आयोजित या अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने पत्रकार ज्ञानेश्वर घुडे,महादेव पिंगळे,यदुराज राजुस्कर, नारायण काटकर, देविदास जोगे, मधुकरराव सोनटक्के, देवलाल बोर्डे ,रवींद्र इंगळे, प्रल्हादराव पानझाडे,महादेवराव अंबाळकर, पांडुरंग गव्हाळे, गणेशराव भटकर,सुनील राजगुरे, नारायण शेगोकार, बाबाराव वानखडे, गजानन राजगुरे, राजू ठोसरे, श्रीकांत माने, मुकुंद इंगोले ,संदीप राजगुरे, नितीन राजगुरे, खुशाल राजगुरे उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या