गोवंश चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, 11 आरोपीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणारी टोळीचा पर्दाफास करून एकुण ११ आरोपीना अटक जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस गुन्हयात वापरेलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, मोटारसायकल सह एकूण २०,९९,५०० रू. चा मुददेमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून गोवंश चोरी करणारे टोळी गजाआड,जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनमधील १६ गुन्हे उघड, एक इनोव्हा चारचाकी वाहन तीन टाटा इंडिका विस्टा चारचाकी वाहने तीन मोटार सायकली
एकुण सहा मोबाईलसह एकुण ११ आरोपी अटक केले आहेत.
सन २०२३ मध्ये अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जनावरे चोरीची मोठ्या प्रमाणात घटना घडत असल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी आदेशित करून गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे ठाणेदार श्री. शंकर शेळके यांनी गोवंश जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस केले. या प्रकरणात आरोपी नामे शेख शकील शेख जलील वय ४२ वर्षे रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला, शेख राजीक शेख रज्जाक वय ३५ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला , मो. असलम मो. अशरफ वय ३६ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला, जाहीद अली राजीक अली रा. ताहपुरा, अकोट , नसीर उद्दीन अलीम उद्दीन रा. ताहपुरा, अकोट , गुलाम शाहीद उर्फ बबलु गुलाम राजीक रा.धारोळी वेस, अकोट , शेख शारीफोद्दीन शेख अलीमोद्दीन रा. ताहपुरा, अकोट , कुदरत खान अहेसान खान रा. इफतेखार प्लॉट, अकोट ,शेख ईरफान शेख उस्मान रा. ख्वाजा नगर, अडगाव बु., वसीम अहेमद जहुर अहेमद रा. कागजीपुरा, अकोट ११) अन्सार अहेमद मुक्तार अहेमद रा. कांगारपुरा, अकोट यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अकोला जिल्हा येथील पो.स्टे. बार्शिटाकळी, पातुर, बाळापुर, उरळ, सिटी कोतवाली, अकोट फाईल, दहिहांडा, अकोट शहर, हिवरखेड, तेल्हारा वेगवेगळया पोलीस स्टेशनचे एकुण गोवंश चोरीचे १६ गुन्हे केल्याचे कबूल केले
या गुन्ह्यामध्ये ज्या फिर्यादीने आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार दिली असेल त्यांनी त्या त्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याची आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि, गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, भारकर धोत्रे, उमेश पराये, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, प्रमोद डोईफोडे, विशाल मोरे, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, अन्सार अहमद, ऐजाज अहमद, आकाश मानकर, फिरोज खान, स्वप्निल चौधरी, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, अब्दुल माजिद, चालक पोशि. प्रशांत कमलाकर, मो. नफिस यांनी केली आहे.
0 टिप्पण्या