Ticker

6/recent/ticker-posts

"मुलींना जन्माला येऊ द्या. मुलीला वाचवा.एक मुलगी सात कुळाचा उद्धार करून पतीचे घराचा सांभाळ करून तुमचा नावलौकिक वाढवीते" -लोककलावंत संजय कडोळे 

"मुलींना जन्माला येऊ द्या. मुलीला वाचवा.एक मुलगी सात कुळाचा उद्धार करून पतीचे घराचा सांभाळ करून तुमचा नावलौकिक वाढवीते" -लोककलावंत संजय कडोळे 


 कारंजा (लाड) : ब्रम्हदेवापाशी पडल्या बंधन गाठी । उद्या जाशील बाई सासरीला । सोडूनी प्रितीच्या माहेराला ॥ या भावानिक गीतावर आख्यान करतांना,स्थानिक जय भवानी जय मल्हार गोंधळी कला मंचाचे संचालक विदर्भातील एकमेव महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी सांगीतले की, "आज आपल्या राज्यात आपल्या समाजात मुलींची म्हणजे महिलांची संख्या कमी होतांना दिसत आहे ही चिंतेची गोष्ट असून, मुलींचा दर घटत गेला तर बहुसंख्य मुलांना लग्नाविनाच ब्रम्हचारी म्हणून राहावे लागेल. हे निसर्ग नियमाविरुद्ध होऊन त्यामुळे अत्याचार वाढतील. जन्माला आलेली आपली मुलगी ही लक्ष्मी-दुर्गा-सरस्वती असते. त्यामुळे मुलींना जन्माला येऊ द्या. मुलींना वाचवा.त्यांना शिकवा. एक मुलगी सात कुळाचा उद्धार करून तुमच्या पतीचे घराचा सांभाळ करून तुमचा नावलौकीक वाढवीत असते." असे समाजप्रबोधन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते माजी पत्रकार राजेश तिवारी यांचेकडील मुलीचे लग्नसमारंभानिमित्त,महेश भवन्न इन्नानी जिन कारंजा येथील गोंधळ जागरणात गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या