रोटी बँक संस्थाचे सचिव डॉ. मुजाहिद यांचा सेवाशक्ती टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार
प्रतिनिधी : नासीर शेख
गरजू लोकांना पोटभर जेवण मिळावा व कोणीही उपाशी पोटी राहू नये या उद्देशाने फलाइंग कलर्स संस्थाद्वारे गेल्या अनेक वर्षापासून अकोला येथे रोटी बँक सुरू आहे. या संस्थेचे सचिव डॉ. मुजाहिद जीवाचा रान करून शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी गोरगरिबांना मोफत जेवन देण्याची सेवा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात त्यांची वेगळीच ओळख आहे.या कार्यामुळे सेवाशक्ती टाईमच्या वर्धापन सोहळा कार्यक्रमात मेहकर येथे डॉ. मुजाहिद यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला, तसेच याआधी राज्यस्तरावर त्यांना सन्मानित करून गौरव करण्यात आला, फलाइंग कलर्स संस्थेचा उद्देश आहे. की, कोणीही उपाशी पोटी न राहणे, तसेच शिक्षणापासून वंचित न राहणे, गरिबांना आर्थिक मदत करणे, आदी लक्ष घेऊन फलाइंग कलर्स संस्था सक्रिय कार्य करीत आहे.
मेहकर येथे आयोजित केलेल्या सेवाशक्ती टाइम्सच्या वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बनचे व्यवस्थापक डॉ. सुकेश झंवर राठोड, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत राठोड, प्रमुख मार्गदर्शक राजश्री शाहू, पतसंस्थाचे संस्थापक संदीप शेळके, संजीवनी मल्टी जालनाचे डॉ. बळीराम बागल, व पत्रकार मंडळी उपस्थित होती.
0 टिप्पण्या