महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी हा महासंकटात, ऊबाठा शिवसेना गटाचे शिवसैनिक आक्रमक
पाऊस नाही,विजही नाही, शेतीला पाणी देताना, शेतकऱ्यांची अडचण. शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपोषणाला जाहीर पाठिंबा
अकोला प्रतिनिधी: संतोष माने
मुर्तीजापूर: विद्युत महावितरण कंपनीकडुन संपुर्ण मुर्तिजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ऊबाठा गटाचे शिवसैनिक आक्रमक जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता शिवसेना तालुका अध्यक्ष पप्पूदादा तिडके यांच्या नेतृत्वात आज 14 नोव्हेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणास सुरुवात...या उपोषणाला शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा
मुर्तीजापुर तालुक्यातील विद्युत महावितरण कंपनी कडुन संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना विनाकारण मानसिक,आर्थीक व शारीरीक त्रास सहण करावा लागत आहे. या होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार चर्चा करुन, प्रत्यक्ष भेटुन वारंवार विनंती करुन सुध्दा शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष अद्याप पर्यंत दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे विदुत महावितरण कंपनीला पुनच्छ निवेदनाद्वारे तक्रार देऊन सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अकोला; उपविभागीय अधिकारी;उपविभागीय पोलीस अधिकारी;तहसीलदार;शहर पोलीस स्टेशन;नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुर्तिजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना १.२४ तास विज पुरवठा करण्यात यावा. २. जळालेले रोहीत्र शेतकऱ्यांकडुन शुल्क अथवा विज बिल न भरता नविन रोहीत्र २४ तासाच्या आत तात्काळ बसविण्यात येऊन विज पुरवठा सुरु करण्यात यावा.
तसेच विद्युत दाब व्होल्टेज पुर्ण स्वरुपात प्रवाहीत करावे, जेणे करुन शेतकऱ्यांचे विजपंप व्यवस्थीत चालतिल. ३. ए. जी. पंपाचे कनेक्शनसाठी जर शेतकऱ्यांची अर्ज केले असतील तर त्या शेतकऱ्यांना ए. जी. पंपाच्या कनेक्शनसाठी तात्काळ कोटेशन देऊन तसेच पैसा भरणा करुन कनेक्शन देण्यात यावे. अशा निवेदनातून नमूद मागण्या सात दिवसाच्या आत जर मान्य केल्या नाही तर ऊबाठा गटाची शिवसेना स्टाईलनुसार आज दि. १४ नोव्हेंबर पासुन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषण करते वेळी जर उपोषण कर्त्याला काही जिवीत हाणी झाल्यास याची संपुर्ण जबाबदारी ही आपल्या विद्युत महावितरण कंपनीची राहील.असा इशाराही देण्यात आला आहे.




0 टिप्पण्या