Ticker

6/recent/ticker-posts

आ. सावरकर यांनी पारधी समाजातील नागरिकांना दिल्या दिवाळीच्या भेटवस्तू

आ. सावरकर यांनी पारधी समाजातील नागरिकांना दिल्या दिवाळीच्या भेटवस्तू


अकोला समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करणे व त्यांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय देश सुजलाम सुफलाम होणार नाही, ही भावना भाजपाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची होती. महात्मा गांधी, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकात्मता व मानवता भाजपाने अंगीकार करून दिवाळीच्या पाच दिवसाच्या पर्वावर वेगवेगळ्या ठिकाणी पारावर जाऊन आदिवासी मागासवर्गीय वंचित समाजातील प्रीत वर्गाला दीप पर्वाचा आनंद साजरा करण्यात यावा यासाठी आज ही आमदार रणधीर सावरकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट समर्पित लोकनेते गोर्धनजी शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अभिप्रेत कार्य समाजातील घटकांना अन्नदान विविध वस्तू वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची परंपरा कायम ठेवून आमदार रणधीर सावरकर व भाजपा महानगर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी परंपरा आजही जपली. आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, जयंत मसने यांच्या नेतृत्वात भाजप दक्षिण मंडळ तर्फे पारावर दिवाळी साजरी करत खडकी परिसरातील पारधी समाजाच्या पारावर जाऊन वंचितांना दिवाळीच्या फराळाचे किट भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी मंडळ अध्यक्ष गणेश अंधारे,नगरसेवक विनोद मापारी,विजय इंगळे,वैकुंठ ढोरे,गणेश सारसे,कुणाल शिंदे,रोहित काळे,नितीन गवळी,गोपाळ मुळे,दिलीप भरणे व परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या