विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दिक्षाभूमीला,कारंजा येथील सामाजिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट
कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून सामाजिक कार्यकर्त्याची दरवर्षी,भारतिय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दिक्षाभूमीला भेट देण्यात येत असते.त्याकरीता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्थाध्यक्ष संजय कडोळे यांचे विशेष नियोजन असते.नुकतेच रविवार दि.05 नोहेंबर 2023 रोजी कारंजा (लाड) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांच्या नेतृत्वात वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार,मराठा समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील गावंडे,माजी प्राचार्य माणिकराव नागरे तथा साहित्यीका अँड.सौ.मंगलाताई नागरे,अतुल भुयार गुरुजी तथा स्त्री शक्ती मंचाच्या राज्याध्यक्षा सौ.शारदाताई भुयार,ख्यातनाम हवामान अभ्यासक गोपाल गावंडे,अमरावती जिल्ह्यातील गोंधळी समाज लोककलावंत गोपाल मुदगल,रुग्नसेवेत कार्यरत समाज सेविका सौ.कृपाताई ठाकरे इत्यादींनी दिक्षाभूमीला भेट देवून महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंगल अभिवादन केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या