Ticker

6/recent/ticker-posts

कोळी महादेव जमातीला विनाअट अनुसुचीत जमातीचे मिळणार जात प्रमाणपत्र 

कोळी महादेव जमातीला विनाअट अनुसुचीत जमातीचे मिळणार जात प्रमाणपत्र 


अकोला जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीला विनाअट अनुसुचीत जमातीचे जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेश.. जिल्ह्यातील कोळी महादेव बांधवांच्या उपोषण आंदोलनाचे यश राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल आमदार सावरकर यांनी आभार व्यक्त केले...आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती उपोषणाची सांगता....


अकोला
कोळी महादेव समाजाला पूर्ववत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण केले होते , सदर मागणीसाठी कोळी महादेव बांधव जात प्रमाणपत्रासाठी व वैधता प्रमाणपत्रासाठी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ समाज बांधव “ 'अन्नत्याग आमरण उपोषण" केले , दि. २६ ऑक्टोबर २०२३ पासून अकोला जिल्ह्यातील सुद्धा कोळी महादेव जमातीला अनुसुचीत जमातीचे जात प्रमाणपत्र सरसकट मिळणेकरीता अँड. मंगेश बुटे (उच्च न्यायालय, नागपुर), श्री संदीप बगाडे, श्री संजय बुंदे हे तीन समाज बांधव अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले. त्यांच्या या रास्त मागणीला आमदार रणधीर सावरकरांनी पाठिंबा जाहीर करून कोळी महादेव समाजाला न्याय देण्यासाठी नागपूर येथे होऊ घातलेल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्न लावून धरण्यात येईल असे आमदार रणधीर सावरकरांनी उपस्थित कोळी महादेव समाजाच्या लोकांना आश्वस्त केले, 


अकोला पूर्व मतदार संघातील कोळी महादेव समाजाचे नेते बाळासाहेब आपोतीकर, डॉ. महेंद्रजी काळे तसेच भारतीय जनता पक्षातील कोळी समाज बांधवांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्व समाज बांधवांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे सन 2014 पासून या प्रश्नात न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती , आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा वेळोवेळी विविध संसदीय कायदे , आयुधांचा वापरून कोळी महादेव समाज बांधवांचा प्रश्न सभागृह लावून धरला होता, येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न तडीस नेण्याची ग्वाही आमदार उपस्थित कोळी समाज बांधवांना दिली, सदरील मागणी व आंदोलनाची तात्काळ दखल घेवून तात्काळ निर्णय घेण्यासाठी कोळी महादेव समाजाच्या शिष्टमंडळासोबत आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना निवेदन सादर केले व याविषयी तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली होती व या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यासाठी व समाजाच्या राष्ट्र मानवी मंजूर करण्यासाठी मोलाची मदत केली त्यांच्यामुळे अनेक वर्षाची मागणी मंजूर होऊन महादेव कोळी समाजाला न्याय मिळाला आहे, याकरिता अकोला जिल्ह्यातील सेतु केंद्रांना कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्राचे मागणी प्रस्ताव विना अट स्विकारण्याचे तात्काळ आदेश देणे तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील निर्णयामध्ये समुद्र किनाऱ्यावरील काही पोटजाती ह्या अनुसुचीत जमातीमध्ये येत नाहीत त्या ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत व उर्वरित महाराष्ट्रातील कोळी नोंद असली तरीही ते अनुसुचीत जमातीतील कोळी महादेव जमातीचेच आहे असा स्पष्ट उल्लेख अनेक न्यायालयीन निर्वाळ्यामध्ये व शासनाचे आदेशात स्पष्ट झालेले आहे, अकोला जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या नोंदी कोळी आहेत म्हणून कोळी महादेव जमातीचा दावा चुकीचा आहे असा चुकीचा निष्कर्ष काही अधिकारी काढतात त्यांचे सूद्धा प्रबोधन होणे आवश्यक अशी सुचना सुद्धा त्यांनी केली, आमदार सावरकर व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कोळी महादेव समाजाच्या वतीने आभार अभिनंदन करण्यात आले आहे तसेच जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सुद्धा याची दखल घेऊन देऊन न्याय दिल्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त करण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या