Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळाअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा मिळणार दिवाळीपूर्वी- पालकमंत्री विखे पाटील

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळाअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा मिळणार दिवाळीपूर्वी- पालकमंत्री विखे पाटील


अकोला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळाअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ तील सोयाबीन हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ( Mid Season Adversity) झालेल्या शेतकऱ्यांना २५% नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी सर्व लोक प्रतीनीधिंच्यावतीने आमदार रणधीर सावरकर यांची पालक मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे मागणी, दिवाळीच्या पुर्वी निधी वितरीत करण्यात येणार असल्याची पालकमंत्री यांची ग्वाही.. दिली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी आपले सहकारी आमदार प्रकाश भारसाकले, हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या वतीने मागणी केली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला
खरीप हंगामात पावसात खंड पडल्यामुळे 20 महसूल मंडळात नुकसानी बाबत अहवाल विमा कंपनीने अहवाल तयार केला होता परंतु पावसाचा खंड विचारात न घेता इतर घटक लक्षात घेऊन पीक नुकसानीचा अंदाज घेणे आवश्यक असते त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सर्व 52 मंडळ नुकसानीचा सर्वे तयार करून नुकसान भरपाई अहवाल निश्चित करण्यात आला त्यानुसार
खरीप हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ / महसूल मंडळ गट / तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे व परिच्छेद क्र. ११.१ अन्वये सदरची याबाबत अधिसूचना जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांनी दि. ६/९/२३ रोजी प्रसिद्ध केली आहे, व या संदर्भात आमदार सावरकर यांनी विभागीय आयुक्त राज्य शासनाकडे पाठपुरावा करून राज्यातील सहा राज्या जिल्ह्यांपैकी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई चा पंचवीस टक्के रक्कम चा प्रस्ताव मान्य करून घेण्यास यश प्राप्त केले होते.


 यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सहा दिवसांपूर्वी पिक विमा कंपनी महसूल अधिकारी कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 टक्के रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते व या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व कृषी अधिकारी संचालक पुणे येथे यांच्याशी संवाद साधला होता व आज पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आल्यावर अकोला जिल्ह्यातील सर्व आमदार च्या वतीने आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना अवगत करून ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले असून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया करण्यात आमदार सावरकर यांना यश प्राप्त झाले आहेत व पूर्ण 52 मंडळात शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मिळण्याच्या दिशेने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार कृषी अधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात देखरेख करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी रक्कम जमा होईल या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे आमदार सावरकरांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी 25% पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आमदार सावरकर यांच्या कृतीचे अभिनंदन केले आहे व सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नात आमदार सावरकर सक्रिय भूमिका करत असतात समाजकारण व शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारे आमदार सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून दिली आहे. आमदार सावरकर यांच्यासोबत अनुप धोत्रे किशोर मानते पाटील जयंत मसने विजय अग्रवाल माधव मानकर श्रीकृष्ण मोरखडे, अनिल गावंडे राजेश बेले शंकरराव वाकोडे, एडवोकेट देव आशिष काकड, वेंकट ढोरे, गजानन उंबरकर, अशोक राठोड, रवी गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या