Ticker

6/recent/ticker-posts

भारताने वर्ल्डकप जिंकल्यास तेलगू एक्ट्रेस विवस्त्र होऊन धावणार बीचवर

भारताने वर्ल्डकप जिंकल्यास तेलगू एक्ट्रेस विवस्त्र होऊन धावणार बीचवर



वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत पुन्हा एकदा तिसरा वर्ल्ड कप आपल्या नावाने करणार असल्याचे भाकीत वेगवेगळ्या स्तरावरून होत आहे. भारताने वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदात कोण काय करेल याचा नेम नसतो, त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम वर्ल्ड कप सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन टीम वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. यासाठी केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड आणि साऊथ सेलिब्रिटीसुद्धा फार उत्सुक आहेत. 

      पहा काय म्हणाली 👆 रेखा बोज
अशातच एका अभिनेत्रीने टीम इंडियाच्या विजयावरून अजब घोषणा केली आहे. जर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर समुद्रकिनारी विवस्त्र धावणार असल्याचं तिने ट्विट केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रेखा बोज. ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करते. तसेच रेखा बोजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्ल्ड कपशी संबंधित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तर मी वैजाग बीचवर विवस्त्र धावेन. रेखाने हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर केला आहे. यासोबतच ती भारतीय क्रिकेट टीमला ऑल द बेस्ट म्हणताना दिसतेय. परदेशात स्ट्रिकिंग केल्याचं अनेकदा पहायला मिळतं. स्ट्रिकिंग म्हणजे जर एखाद्या खेळात मोठा विजय प्राप्त झाला, तर त्याचा जल्लोष करण्यासाठी विवस्त्र धावलं जातं. रेखानेही अशाच प्रकारे स्ट्रिकिंग करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या