Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी माहिती पोर्टलवर 30 नोव्हेंबर पूर्वी अपलोड करावी- आ.सावरकर 

शेतकऱ्यांनी माहिती पोर्टलवर 30 नोव्हेंबर पूर्वी अपलोड करावी- आ.सावरकर 



अकोला- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना पोर्टलवर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत माहिती अपलोड करण्यात यावी यासाठी राज्य शासनाने तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार सहकार मंत्री तसेच कृषी मंत्री यांनी याकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्यामार्फत सदरील पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना दिलेल्या आहेत, तरी समस्त शेतकऱ्यांनी आपली माहिती पोर्टलवर दिनांक 30 नोव्हेंबर पूर्वी अपलोड करावी जेणेकरून आपण सवलतीपासून आपण वंचित राहणार नाही ,



दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोर्टल सुरू आहे तरी अद्ययावत माहिती अपलोड  करावी ही विनंती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्यासाठी ही महत्त्वाची योजना सुरू केली होती परंतु सरकार बदलल्यानंतर तीन वर्षे यावर महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही करण्यात आला नाही या संदर्भात आमदार  सावरकर यांनी आपले सहकारी आमदारांच्या मार्फत या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते विधिमंडळात लक्षवेधी तसेच विविध  तारंकित  प्रश्न उपस्थित करून तसेच सरकारकडे पाठपुरावा करून कर्जमाफी नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा त्यांना प्रोत्साहन पण रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली होती.


 अकोला जिल्ह्यात या शेतकऱ्यांचे संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली होती ती मागणीची सरकारने दखल घेतली असून 30 नोव्हेंबर पर्यंत या पोर्टेबल माहिती शेतकऱ्यांनी भरून या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती खासदारसंजय भाऊ धोत्रेआमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल तेजराव थोरात विजय अग्रवाल किशोर पाटील अनुप धोत्रे बळीराम सिरस्कार, जयंत मसने श्रीकृष्ण मोरखडे, प्रभाकर मानकर शिवाजीराव देशमुख हिरासिंग राठोड बाळासाहेब आपोतीकर शंकरराव वाकोडे राजेश बेले मनीराम टाले वैशाली निकम मोनिका गावंडे जयश्री फुंडकर, श्रावण इंगळे  हरिनारायण माकोडे, सुमन ताई गावंडे वैशालीताई शेळके गीतांजलीताई शेगोकार चंद्रशेखर पांडे विजय मालोकार यांनी केली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या