अवकाळी पाऊस, रविवार 26 नोव्हेंबर चा पाऊस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात
अकोला : अकोला जिल्ह्यात दि. २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडेल, अशी शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. अकोला येथील हवामान अभ्यासक श्रीकांत लांडे सर यांच्या माहीतुसार 26 नोव्हेंबर रात्री दरम्यान गुजरात कडून येणारा पाऊस, नंदुरबार, धुळे मार्गे महाराष्ट्रात व्यापेल. परंतु हा पाऊस - नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तर पुढे पुढे जितके दूर दूर चे जिल्हे असतील त्यात पाऊसाचे प्रमाण होत कमी राहील. रविवार 26 नोव्हेंबर चा पाऊस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात आहे. जास्त पाऊस बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असा कमी पाऊस कमी होत जाईल.
वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असल्यास सदर मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या