Ticker

6/recent/ticker-posts

11 महाराष्ट्र बटालियन आणि एचडीएफसी बँक अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

11 महाराष्ट्र बटालियन आणि एचडीएफसी बँक अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न


एनसीसी दिवस निमित्त 11 महाराष्ट्र बटालियन व एचडीएफसी बँक शाखा गोरक्षण रोड अकोला आणि 11 महाराष्ट्र बटालियन 27 नोव्हेंबर 2023 रोजी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले. एचडीएफसी बँक शाखाक्षेत्र प्रमुख मनीष वारके यांनी याप्रसंगी एका रक्तदात्याच्या रक्त दान केल्याने तीन जणांचं आयुष्य वाचू शकते असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी.पी. भदोला यांनी रक्तदान करण्यासाठी आलेल्या विविध महाविद्यालयातील कॅडेटला रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर संजीवन ब्लड बँक अकोला यांच्याद्वारे रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.


रक्तदान कार्यक्रम प्रसंगी प्रथम बटालियनचे कमांडिंग ऑफिसर, आणि सुभेदार मेजर यांनी रक्तदान केले. लेफ्टनंट डॉ. उज्वला शिरसाट पी डी के व्ही अकोला, सी टी ओ डॉ. हरिश्चंद्र नरेटी एस ए कॉलेज अकोला, लेफ्टनंट डॉ. सुनील बोरचाटे एस आर कॉलेज वनोजा, सुभेदार तेजबिर सिंग, सुभेदार लाभ सिंग, हवालदार दीपक छत्री, हवालदार विजय वानखडे, हवालदार सदानंद वानखडे, हवालदार जीवन बहादुर, हवालदार आशिष आठवले, यांच्यासह महा विविध महाविद्यालयातील 39 एस डी कॅडेट आणि 50 एस डब्ल्यु कॅडेट नी रक्तदान केले. रक्तदान शिबिराची सांगता एनसीसी गीत आणि 11 महाराष्ट्र बटालियनचा जय जयकार करून करण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या