वीर सैनिकांना नमन करणे कर्तव्य असून हुतात्मा स्मारकाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
अकोला
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना नमन करणे हे कर्तव्य असून या दृष्टीने महाराष्ट्र सरकार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी सरकारने अकोला येथील स्थानिक हुतात्मा स्मारक इथे 28 शहिदांना आदरांजली म्हणून त्यांचे पुतळे उभारून सातत्याने नवीन पिढीला त्यांच्या कर्तुत्वाची त्यांच्या त्यागाची कल्पना असावी यासाठी व पेरणा मिळावी म्हणून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कोटी 74 लाख 90 हजार रुपयांचे खर्च करून सुरेख सुंदर युद्ध शहीद स्मारक ची उभारणी केली असून याचा उद्घाटन राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता होत असून सामाजिक दायित्वासोबत राष्ट्रभक्ती चेतना जागृतीचं काम सरकारने केले असून अकोला मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असून या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकिसन विखे पाटील आमदार अमोल मिटकरी जिल्हा परिषद अध्यक्ष आढाव ताई, आमदार वसंत खंडेलवाल आमदार किरण सरनाईक आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे जिल्हाधिकारी अजित कुंभारे आयुक्त निधी पांडे आयुक्त कविता त्रिवेदी पोलीस अधीक्षक संदीप घुगे माजी महापौर अर्चनाताई मसने माजी महापौर विजय अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
1 शालीग्राम सुर्यभान दांगटे
2 उदेभान सिताराम तेलगोटे
3 महादेव नामदेव तायडे
4 दुर्योधन झाबुजी सिरसाट
5 यशवंत नथ्थु सरकटे
6 शेषराव श्रीराम म्हैसने
7 यशवंत आनंदराव देशमुख
8 राजकमल जस्सुलाल महाजन
9 प्रल्हाद भोलाजी साव
10 आनंदा सखाराम काळपांडे
11 अनिल ज्ञानदेव निखाडे
12 सुधाकर नागोराव खडेंकर
13 नंदकिशोर तुकारामजी खाडेंकर
14 विनोद राजाभाऊ देशमुख
15 हरिचंद्र पंढरी वानखडे
16 विजय श्रीराम ताथेड
17 संतोष खुशाल जामणिक
18 ठाकरे निरंजन दयाल
19 दगडु रामजी लाहाने
20 भास्कर श्रीरीम पातोंड
21 तेजराव बळीराम दंदी
22 विजय बापुराव तायडे (मरणोपरांत सेना मेडल)
23 मोहड विनोद यशवंत
24 कैलाश काशिराम निमकंडे
25 प्रशांत प्रल्हाद राऊत
26 संजु सुरेश खंडारे
27 आनंद शत्रुघ्न गवई
28 सुमेध वामन गवई (मरणोपरांत सेना मेडल) यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी या दृष्टीने प्रयत्नशील राहून तत्कालीन पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून हे स्मारक प्रेरणादायी उभा करण्यास आग्रह भूमिका घेतली त्यामुळे हे स्मारक उभे झाले आहे असून कार्यक्रमात सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे या परिसर स्वच्छ राहण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सुद्धा प्रयत्नशील असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस येत असल्यामुळे अकोला शहरांमध्ये भाजपाचे झेंडे तसेच होल्डिंग बॅनर्स व विकास शील कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील अनुप धोत्रे जयंत मसने विजय अग्रवाल यांनी केले.
0 टिप्पण्या