उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी विविध वास्तूंचे होणार उद्घाटन
अकोला
अकोला, वाशीम, बुलढाणा, हिंगोली, अमरावती जिल्ह्यांनी संजीविनी ठरणाऱ्या आरोग्य सेवा क्रांती अंतर्गत देशाचे यशस्वी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून सेवा पंधरवडा अंतर्गतराज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व खा. संजय धोत्रे यांचे संकल्पनेतून विशाल मोफत आरोग्य शिबीर तसेच अकोला पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सेवेत भर घालणारी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय कोनशीला समारोह तसेच बोरगाव मंजु येथे ग्रामीण रुग्णालयाचा भूमिपूजण कोनशीला व १९५२ ते २०२३ पर्यत जिल्ह्यातील सीमेवर देश संरक्षणात प्राण देणारे हुतत्मांचे स्मारक नवीन पिढीला प्रेरणा दायी ठरण्याचे दृष्टीने उभारण्यात आले असून जनतेला खुले दालन उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील लोकनेते व सर्व सामान्यांना न्याय देणारे राज्याचे उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आज राज राजेश्वर नगरीमध्ये येत असून त्यांचे सोबत जिल्ह्याचे पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा विविध सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार कडून खा संजयभाऊ धोत्रे यांनी ८०% निधी तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना फडणवीस यांनी २०% निधी देऊन अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची उभारणी केली परंतु राज्याचे महाविकास आघाडी सरकार यांनी पदभरती मंजुरी ण दिल्यामुळे हॉस्पिटल सुसज्ज असून सुद्धा जनतेला उपयोगी पडत नव्हते. मध्यंतरी कोविड काळात दोन कक्ष या परिसरात सुरु करण्यात आले होते. आ रणधीर सावरकर हॉस्पिटल सुरु करण्याचे दृष्टीने व पद भारती करिता आग्रही भूमिका घेऊन प्रयत्नशील होते. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी सरकारने पद भरतीची प्रक्रिया केली असून आकृतिबंधा प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा पाठपुरावा सुरु असून अत्याधुनिक माशिनीचा लाभ व्हावा व तज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ रुग्णांना व्हावा या साठी अकोला सुपर स्पेशालिटीची कोनशीला राज्याचे उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते ७ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता होत आहे.
तसेच शिवापूर येथे ५ एकर परिसरात १०० खाटांचा अद्यावत ४-शल्य गृह, अतिदक्षता विभाग कामाचा शुभारंभ तसेच पालघरच्या धर्तीवर राज्यातील दुसरे बोरगाव मंजु येथे ग्रामीण रुग्णालय ना, देवेद्र फडणवीस यांचे सहकार्याने व आ. रणधीर सावरकर यांचे प्रयत्नाने १८ कटी ७५ लाख रुपयाचे भव्य इमारतीचा कोनशीला तसेच खा संजयभाऊ धोत्रे व तत्कालीन पालक मंत्री ना. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने स्थानीक हुतात्मा स्मारक येथ २८ शहीद विर सैनिकांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा सुद्धा ना देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होत आहे व अकोला लोकसभा मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने ना देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्याने खा संजय धोत्रे यांचे संकल्पनेतून दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत आरोग्य शिबीर त्यामध्ये उपचार व शस्त्रक्रिया, तपासणी शिबीर होणार असून याचे उद्घाटन ना फडणवीस यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील राहणार असून कार्यक्रमासाठी खा. संजयभाऊ धोत्रे, आ गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. नितीन देशमुख, आ अमित झनक, आ अमोल मित्कारी आ .वसंत खंडेलवाल, आ किरण सरनाईक, जिल्हापरिषद अध्यक्ष श्रीमती संगीताताई अढाऊ,जिल्हाधिकारी अजित कुंभार अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ मीनाक्षी गजभिये, आरोग्य उप संचालक डॉ तरंग तुषार वारे, श्रीमती कविता द्विवेदी मनपा आयुक्त आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.
खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या संकल्पनेतून भव्य आरोग्य शिबीर हे होत असून सन २०१८ नद्गे १८५२५ नागरिकांनी लाभ घेतला त्यामध्ये मेडिसिन विभागातील ७४२३ स्त्री रुग्ण ४६३९ बाल रुग्ण ३१२३, नेत्र रुग्ण,३२०९, १५४३ नाक-कां-घसा, हाडाचे विकार २५९०, कर्क रूग २९५, मूत्राशय ८९०, रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.
आरोग्य शिबीर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देणार असून पक्षाने युवा नेतृत्व अनुप धोत्रे यांना संयोजक म्हणून जबाबदारी देऊन ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सरकारी यंत्रणेच्या सहकार्याने योजनेचा लाभ पोहोचविण्याचे दृष्टीने सतत एक महिन्यापासून २ हजार कार्यकर्ते, आ गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल आदींच्या नेतृत्वात ४५ समित्या या मध्ये जिल्हा पदाशिकारी, तालुका पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असून ७ ऑक्टोबर २३ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य सेवक, आरोग्य प्रेमी, रुग्ण तसेच भाजपा-शिवसेना –राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी स्थानिक मेन हॉस्पिटल येथे मोठ्या संख्याने उपस्थित राहावे अशी विनंती अनुप धोत्रे यांनी केली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या