महानगरातील विद्यार्थी व नागरिकांचे अपघातांत मृत्यु पासून सुरक्षा करा == शिवसेना
रस्ता दुरूस्ती करावीची मागणीसाठी शिवसेनेने केले आंदोलन
अकोला. === महानगरातील गेल्या काही वर्षात तयार झालेल्या रस्त्यांमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून पायी जा किंवा वाहनाने जा अपघात होतातच. या रस्त्यांवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सतत ये जा करावी लागते आणि खड्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे किरकोळ अपघात झालेले आहेत. तर अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. हे सर्व चित्र थांबवायचे असेल तर रस्ते सू स्थितित करणे गरजेचे आहे. हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीच्या आधारे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने पोस्ट ऑफिस ते सिव्हील लाईन रस्त्यांवर एल आर टी कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगर पालिका च्या वतीने अभियंता अजय गुजर यांनी आंदोलन स्थळी उपस्थीत होऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या सोबत बोलणी करून येत्या तिन ते चार दिवसांच्या आतमध्ये महानगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून रस्त्यावर दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही लिखित स्वरूपात सांगीतले आहे.
यावेळी शिवसेना उधव ठाकरे गटाचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, माजी नगरसेवक शरद तूरकर ,माजी नगरसेविका देवश्री ठाकरे, जिल्हाध्यक्ष राहुल कराळे ,मुकेश मुरमकार यांच्या नेतृत्वाखाली अमित भिरड ,देवा गावंडे, छोटू धुर्वे ,ललित मिश्रा ,आशुतोष शेगोकार, राजेश इंगळे ,रवी मडावी, विशाल घरडे, अभय खुमकर, शैलेश इंगळे , संजय अग्रवाल, प्रमोद धर्माळ, निवृत्ती तिजारे, महिला आघाडी सुनीता श्रीवास, सीमाताई मोकळकर ,पूजा मालोकार , सतिष नागदिवे, प्रकाश वानखडे, राजेश खानापुरे, गजानन पाल, बाळू ढोले, सुरेंद्र विसपुते ,अविनाश मोरे ,बंडू सवई ,किशोर ठाकरे, अनिल परचुरे ,मनीष मोहोड यांचे सह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या