Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यातील रखडलेल्या नवीन अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा वर्ग तुकड्यांची प्रस्ताव पडताळणी संपन्न

अकोला जिल्ह्यातील रखडलेल्या नवीन अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा वर्ग तुकड्यांची प्रस्ताव पडताळणी संपन्न


---------------------------------------
पुढील दोन ते तीन दिवसात सर्व अनुदान आदेश वितरित केले जाणार
----------------------------------------
मा.पटवे साहेब,शिक्षण उपसंचालक,अमरावती विभाग यांच्या देखरेखी मध्ये पडताळणी संपन्न


अकोला जिल्ह्यातील बहुतांश नवीन अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे अनुदान आदेश प्रलंबित होते. यासंदर्भात मा  श्रीकांत देशपांडे सरांनी २० जुलै रोजी सभा आयोजित करण्याची विनंती मा ना .श्री दिपक केसरकर साहेबांना केली होती. परंतु काही कारणाअभावी आदेश सदोष आनल्या गेले व नाहक शिक्षक बांधवांना खुप त्रास सहन करावा लागला . शिक्षकांना वचन दिल्याप्रमाणे त्या सभेचे सुधारित इतिवृत्त दिनांक 15 सप्टेंबर रोजी निर्गमित केले व त्यानुसार आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सर्व प्रलंबित शाळा व तुकड्यांचे प्रस्ताव पडताळण्यात आले. यामध्ये अंशतः अनुदानित शाळांचे वैध विद्यार्थी तथा पूर्वीचा टप्पा घेत असलेले मान्य शिक्षक पदे ह्याच बाबी पाहणे आवश्यक होते. तर नवीन 20 टक्क्यावर येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तथा वर्ग तुकड्या यांना 11 पैकी 6 निकष पूर्ण करणे आवश्यक होते. याबाबतीत मा श्रीकांत देशपांडे सर आणि मा. आ. किरणराव सरनाईक पूर्वीपासूनच सर्वतोपरी प्रयत्नशील होते. आजही प्रस्ताव पडताळणी कार्यक्रमाला श्री श्रीकांत देशपांडे  सर व मा. आ. किरणराव सरनाईक  उपस्थित होते. त्या आगोदर शासकीय विश्रामगृह अकोला येथे शिक्षकांशी संवाद साधला , यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. तथा त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या अधिकाऱ्यांकडून सोडवून घेतल्या जाईल असे आश्वासित केले. मा.श्री पटवे साहेब यांनी सुद्धा सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले व कुणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.यावेळी मुख्याध्यापक संघ विदर्भ प्रांताध्यक्ष श्री शत्रुघ्न बिडकर, श्री पद्माकर देशमुख,श्री किशोर वाहने, श्री संदीप जढाळ, डॉ के बी देशमुख, छत्रपती वाकोडे,श्री पखाले सर, श्री गावंडे सर, श्री वाहूरवाघ सर,शिरसाट सर,राऊत सर,इसाक , सरफराज सर , राहीसर, जमीर पटेल साहेब ,जिया उल्ला खान सर , साबीर कमाल सर , तथा अनेक मराठी व उर्दू विभागाचे शिक्षक तथा अकोला जिल्हा शिक्षक आघाडी संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते. मा.श्री पटवे साहेब शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी श्रीमती पाटेकर मॅडम यांनी लवकरात लवकर अनुदान आदेश वितरित करण्याचे मान्य केले.यावेळी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आभार व्यक्त केले.
--------------------------------


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या