धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमिरमा फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त 25 ऑक्टोंबर रोजी अकोला क्रिकेट क्लब ग्राऊंडवर दर वर्षी प्रमाणे यंदा ही ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांची सभा होती. सभे करिता अनेक गावातून, शहरातून लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून व ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सभेकरिता होणाऱ्या गर्दीचा अंदाजा घेत समाज सेवेत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुमिरमा फाउंडेशन मार्फत विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्देश एवढाच की जास्ती जास्त रुग्णांना सेवा देण्यात यावी.
या शिबिरात, सुमिरमा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा व नेत्र विशेषज्ञ डॉ. पूजा खेतन मॅडम यांनी रुग्णांचे डोळे तपासून योग्य ते औषधे दिले. तसेच रुग्णांना गरज असल्यास पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. नेत्र तपासणी विनामूल्य तर होतीच पण गरजू रुग्णांना औषधे देखिल सुमिरमा फाउंडेशन तर्फे विनामूल्य देण्यात आले. शिबिरात शेकडोच्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला.
सुमिरमा फाउंडेशन च्या या नेत्र तपासणी शिबिराच्या यशस्वीते करिता सुमिरमा फाउंडेशनचे आशिष खिल्लारे, विशाल धांडे, निखिल भोंडे, सागर पाटील, ॲड विनोद इंगळे साहेब, संतोष उर्फ सोनू ठाकूर, सौ. भावना अग्रवाल, कु. अश्विनी परदेसी यांनी अथक परिश्रम घेतले
0 टिप्पण्या