अकोला रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, होणार पाच मजली शॉपिंग मॉल
अकोला गांधीनगर तसेच झाशी रेल्वे रेल्वे स्टेशन पुनर्विकास केल्यानंतर रेल्वे मंत्राडलयाच्या रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथारिटीने देशभरातील शंभर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात विकसित करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात अकोला नाशिक रोड अमरावती खंडवा रेल्वे स्टेशनचा समावेश असून या स्टेशनच्या नव्या इमारती बांधून त्या ठिकाणी शॉपिंग, मॉल, हॉटेल , सिनेमा गूहासह एअरपोर्टच्या धरतीवर विकसित करण्याचा निर्णय घेतला असून अकोला रेल्वे स्थानकावर पाच मजली इमारतीसाठी शंभर कोटी रुपयांची योजना मंजूर झाली असून खासदार संजय भाऊ धोत्रे यांना अभिप्रेत कार्य होत असून खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे . निधीची तरतूद करून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे या इमारतीमध्ये जिम लग्न समारंभासाठी हॉल, आर्ट गॅलरी, सिनेमा हॉल, एटीएम सुविधा, विश्रांतीची सुविधा, एकस लेटर, रुग्णालय पाच मजली इमारत अकोल्यात रेल्वे स्थानकावर उभी राहणार आहे या संदर्भात रेल्वे अधिकारी यांची चर्चा खासदार संजय धोत्रे यांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर व अनुप धोत्रे वसंत बाछुका यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखडा अनुसार अकोला रेल्वे स्थानकाचे कामकाज सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरच प्रक्रिया सुरू होऊन टेंडर निघून अकोले करांना अभिप्रेत कार्य होऊन अकोला रेल्वे स्थानक पर्यटक स्थळ म्हणून विकसित होणार आहे.
0 टिप्पण्या