Ticker

6/recent/ticker-posts

दिल्लीतील मॅरेथॉन मध्ये नानांना मिळाले पदक

दिल्लीतील मॅरेथॉन मध्ये नानांना मिळाले पदक


दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीत वेदांता तर्फे Delhi half marathon आयोजित करण्यात आली होती.अकोल्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, भाजप नेते अरुण उपाख्य नाना कुळकर्णी यांनी वरीष्ठ गटातून यात सहभाग घेतला. युवा गटात क्रीडापटू असलेली त्यांची कन्या केतकी हिने सुद्धा सहभाग घेतला होता. पाच वर्षांपूर्वी नाना यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे. परंतु यावर मात करत नानांनी नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा, माहूरगड परिक्रमा करून एक प्रकारचा विक्रम स्थापीत केला आहे. त्यांच्या या मोहिमांची नोंद इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे. याबाबत अनेक संस्था द्वारा त्यांचा सन्मान सुद्धा झाला आहे.


दिल्लीत वेदांता द्वारा आयोजित या मॅरेथॉन मध्ये श्री नाना कुळकर्णी यांना पदक मिळाले असून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. नाना कुळकर्णी संघाचे स्वयंसेवक असून आरएलटी विज्ञान महाविद्यालयातुन ते निवृत्त झाले आहेत. अकोला भाजप चे अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. जुन्या शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत.
त्यांच्या या प्रेरणादायी पक्रमासाठी आदरणीय नानांचे सर्वत्र भिनंदन होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या