Ticker

6/recent/ticker-posts

श्री.जगदंबा माता संस्थान,लाखनवाडा, निंबी मालोकार येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ

श्री.जगदंबा माता संस्थान,लाखनवाडा, निंबी मालोकार येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ


श्री क्षेत्र लाखनवाडा येथे माता तुळजाभवानी व आई रेणुका एकाच व्यासपीठावर विराजमान असून हे महाराष्ट्रातील दोन शक्तीपीठे एकत्रित असलेले एकमेव तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी नवरात्रा मध्ये हजारो भाविक दर्शनासाठी दुरवरून येत असतात.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन श्री.जगदंबा माता ट्रस्ट व गावकऱ्यांद्वारा केल्या जाते यामध्ये जवळपास 15 ते 20 क्विंटल ज्वारी च्या भाकरी व दोन ते अडीच क्विंटल दाळीचे वरण असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चमत्कारीक अशी पोत प्रदक्षिणा असते ज्याचा दिव्य चमत्कार याची देही याची डोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या शहरातील हजारो भाविक पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी येतात व या दिव्य चमत्काराचा अनुभव घेतात. नवरात्रोत्सवात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये गाथापारायण,देवी भागवत कथा,हरिभजने, कीर्तने, काकडा आयोजित केली जातो असे ट्रस्ट चे कोषाध्यक्ष श्री.अविनाश मते यांनी कळविले आहे.


टिप:- यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण असल्याकारणाने महाप्रसादाची वेळ १० ते २ व पोत प्रदक्षिणा दुपारी २ वाजता काढण्यात येईल याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या