भाजपा शिक्षक आघाडी अकोला ग्रामीण जिल्हा संयोजक पदी बाळकृष्ण गावंडे यांची नियुक्ती
अकोला
13 सप्टेंबर 23 पुणे येथील भांडारकर सभागृहात भाजपा शिक्षक आघाडी पद नियुक्ती व पत्र वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते अकोला जिल्हा शिक्षक आघाडी संयोजक (अध्यक्ष) म्हणून बाळकृष्ण गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा शिक्षक आघाडी अकोला ग्रामीण जिल्हा संयोजक पदी बाळकृष्ण गावंडे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्राचे संयोजक डॉ प्रशमजी कोल्हे सर, विक्रम पाटील, मेधा कुलकर्णी मॅडम, विदर्भ अमरावती विभाग शिक्षक आघाडी संयोजिका सौ. संगीता शिंदेताई व सर्व विभागाचे संयोजक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान घराघरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींचे केलेली कामे व पुढील कार्य पोहचावे म्हणून प्रत्येकाने सरल ऍप डाउनलोड करून व प्रत्येक संयोजकाने 3 तास 13 मास पक्षाचे कार्य कसे करावे याबाबत साहेबांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या