कृती समितीच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश
अकोला जिल्ह्य़ाकरिता स्वतंत्र आदेश निर्गमित
माजी आ. श्रीकांत देशपांडे साहेब यांनी बजावली महत्त्वाची भुमिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अकोला जिल्ह्य़ातील प्रलंबित टप्पा अनुदान मंजूरिचे आदेश तात्काळ काढण्यात यावे यासाठी आझाद मैदानावर दि. 12 सप्टेंबर 2023 पासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून शिक्षणाधिकारी यांनी अपात्र ठरविलेल्यामुळे मागील 9 महिन्यापासून वाढीव टप्पा अनुदान आदेशपासून वंचित असलेल्या अकोला जिल्ह्य़ातील अनेक शाळा व शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. सोबतच महाराष्ट्रातील पालघर व ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना व महाराष्ट्रातील अनेक शाळांना सुध्दा याचा फायदा होणार आहे.
मा. आ श्रीकांत देशपांडे साहेब यांनी सतत पाठपुरावा करून व आंदोलनाच्या दबावामुळे अखेर अखेर या शिक्षकांना खरया अर्थाने न्याय मिळाला आहे. आज किरण सरनाईक साहेब, आ. धिरज लिंगाडे साहेब यांनी पण सतत पाठपुरावा केला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे विभाग अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट सर, बाळकृष्ण गावंडे सर, उमेश साखरे सर, पुंडलिकराव रहाटे, विनोद इंगळे सर, सोहेल सर, तसेच कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर, सचीव प्रकाश पाटील सर व अकोला जिल्ह्य़ातील अनेक अन्यायग्रस्त शिक्षक बांधव सहभागी झाले होते. अशी माहीती म. रा.कायम विना अनुदानित शाळा कृती समिती अमरावती विभाग अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या