कॅनॉलचे नुकसान करणाऱ्या तिघेविरुद्ध गुन्हा दाखल
खेट्री येथील घटना : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे गट क्रमांक ७२ /१ मधील कॅनॉलचे पाणी संगणमताने आडून कॅनॉलचे नुकसान करणाऱ्या खेट्री येथील आरोपी महादेव डहाळे, संतोष महादेव डहाळे, सचिन कृष्णा आप्पा डहाळे, यांच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी विविध कलमान्वये १३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. तिघांनी संगणमताने कॅनॉलवरील शेत रस्ता गेल्या अडीच महिन्यापासून गैरकायदेशीर आडवीला होता, त्यामुळे शेतीची कामे रखडली होती, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट प्रकल्प विभाग व पातुरते तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती, सदर तक्रारीवर १२ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांनी अडीच महिन्यापासून आडविलेल्या रस्ता पोलिसांच्या बंदोबस्तात मोकळा केला आहे. कॅनॉल मध्ये सिमेंटच्या तुंबड्यांमध्ये रेती भरून कॅनॉलमध्ये टाकून पाणी आडून कॅनॉल फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश सुरेश सांगळे, यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी महादेव डहाळे, संतोष महादेव डहाळे, सचिन कृष्णा आप्पा डहाळे, यांच्याविरुद्ध १३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.
प्रशासनासोबत मूजुरी करणे भोवले
गैरकायदेशीर तिघांनी कॅनॉल वरील शेत रस्ता अडीच महिन्यापासून अडून प्रशासनासोबत मुजोरी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे भोवले असून, प्रशासनाने मूजुरी करणाऱ्यांना आळा घालून गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक्रिया
खेट्री येथे कॅनॉल वरील शेत रस्ता अडून कॅनॉलचे नुकसान केल्याप्रकरणी प्रकल्प विभागाच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाला पोलीस बंदोबस्त देणे आमचा कर्तव्य आहे.
योगेश वाघमारे ठाणेदार पोलिस स्टेशन चान्नी
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या